महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' सुरु होताच भाजप नेत्यांकडून त्यांच्या बदनामीसाठी फेक व्हिडिओचा वापर सुरु, आ. भातखळकर आघाडीवर
MLA Atul Bhatkhalkar | सोशल मीडियावर 2021 मधील एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे व्हिज्युअल असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा पत्रकारांनी त्यांनी लॉन्च केलेल्या पुस्तकाचा बॅकसाइड व्ह्यू दाखवण्यास सांगितले तेव्हा राहुल गांधींनी आपली पाठ दाखवली. दरम्यान, भाजप आयटी सेलचे कट्टर समर्थक आणि कोणतीही शहानिशा न करता फेक कन्टेन्ट शेअर करण्यात पीएचडी प्राप्त करणारे भाजपचे मुंबईतील आमदार नेहमीच असं काही तरी शेअर करतात आणि समाज माध्यमांवर स्वतःचे डिजिटल वाभाडे काढून घेण्यात प्रसिद्ध झाले आहेत. होय कारण त्या पोस्टमध्ये केलेल्या दाव्याची पडताळणी केल्यानंतर सत्य समोर आलं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
VIDEO | मोदींच्या वाढदिवसादिनी भाजप आणि गोदी मीडिया असं अभियान राबवणार | आधीच केली होती पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मोदी आज ७१ वर्षांचे झाले. याचनिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्वतः नरेंद्र मोदी, मोदी सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आधीच निश्चित करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
फॅक्ट-चेक | ट्विटरने २१ मे २०२१'ला सुरु केलेला रिव्हिव्ह प्रोग्रॅम | दिली होती पूर्व सूचना | भाजपकडून राजकारण
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमावली तयार केली होती. यासाठी फेब्रुवारी महिन्यात एक विधेयक लोकसभेत पास करण्यात आले होते. यावरुन केंद्र सरकार आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांची पोलखोल | ट्विटरकडून कांगावाखोर भाजप नेत्याच्या टूलकिट पोस्टला 'फेरफार मीडिया' शेरा
देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत होते. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | अखेर अमित शहांनी सत्य सांगितलं? | मोदीजी २४ तास झोपतात कारण देशातील गरिबांचं भलं व्हावं
सध्या भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा होताना दिसत आहेत. मोदी आणि शहांनी अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये सभांचा सपाटा लावला आहे. त्यात सभांमध्ये मोठे दावे आणि प्रतिदावे केले जातं आहेत. त्यातील एका सभेत अमित शहा यांनी मोदी गरिबांच्या कल्याणासाठी नेमकं काय करतात ते सत्य उघड केल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “नरेंद्र मोदीजी २४ तास झोपतात कारण या देशातील गरिबांचं व्हावा म्हणून आणि दीदी २४ तास विचार करतात की माझा भाचा कधी मुख्यमंत्री बनेल’. भाजप समर्थकांनी नंतर ‘सोते’ या शब्दाला ‘सोचते हैं’ असं असल्याचं म्हटलं.
2 वर्षांपूर्वी -
Fact Check | रिहानाच्या बदनामीसाठी तेच जुनं तंत्र उपसलं | पण हे आहे सत्य
केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळताना दिसत आहे. रकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला मंगळवारी अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही पाठिंबा दिलाय. त्यामुळे सोशल मिडियावरील वातारवण ढवळून निघालं आहे. त्यानंतर त्यांच्या बदनामीसाठी सरकार समर्थक पुढे आले असून त्यांनी समाज माध्यमांवर खोटा प्रचार सुरु केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याला समर्थन | विरोधकांच्या बदनामीसाठी भाजप प्रवक्त्याकडून फेक VIDEO तंत्र
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ओनजीसीचे संचालक संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे, त्यानंतर ट्विटर अकाऊंट्सने हा व्हिडिओ शेअर करुन केजरीवाल यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, केंद्र सरकारच्या नवीन तिन्ही कृषी कायद्याचं समर्थन करणारा अरविंद केजरीवाल यांचा हा व्हिडिओ एटिडेट असल्याचा दावा एका फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
गुजरात दौरा | शेतकरी बैठकीत भाजप कार्यकर्ते | गुजरात CMO'कडून माध्यमांना चुकीची माहिती
विरोधकांच्या विरोधानंतरही संसदेत केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या कृषी विधेयकातील तरतुदींविरोधात शेतकरी आंदोलनाला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कडाकाच्या थंडीत कुडकुडत्या स्थितीत शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसलाय. मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकऱ्यांच्या अनेकदा चर्चा होऊनही त्यातून काहीही मार्ग निघू शकलेला नाही. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही आंदोलकांचं समाधान झालेलं नाही.
2 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा कट | फेक व्हिडिओ शेअर करणारे अनेक भाजप समर्थक
दिल्लीतील आंदोलक शेतकरी हे पाकिस्तान व चीन यांच्या मदतीने आंदोलन करीत आहेत. किंवा तिथे पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान की जय, दहशतवाद्यांना सोडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील घोषणाबाजी सुरू असल्याचे दावे करणारे व्हिडिओ आणि फोटो सध्या जोरात शेअर केले जात आहेत. परंतु, असे व्हिडिओ आणि त्यावर आधारित फोटो खोटे असल्याचे ऑल्ट न्यूजने फॅक्टचेक मध्ये म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंसाठी सावधानतेचा इशारा | हिंदू शब्दा आडून मोठं अभियान | Fact Check Alert
दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले होते. “ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे,” असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला होता आणि त्याला मराठीसहित हिंदी प्रसार माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Fake News | पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी घोषणांचं वृत्त खोटं | ठराविक माध्यमांकडून खोटं वृत्त
पाकिस्तानच्या संसदेत मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या असं वृत्त गुरुवारी काही प्रसारमाध्यमांनी चालवलं. यामध्ये TRP scam संबंधित अतिउतावळ्या वाहिन्या साहजिकच आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फ्रेंच उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भातल बोलत होते तेव्हा बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या असंही या वृत्तात सांगण्यात आलं होतं.
2 वर्षांपूर्वी -
Fact Check | कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई | PMJJBY आणि PMSBY योजनेतील सत्य
देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत 85 हजार 362 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांवर पोहोचला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Fact Check | शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याचा कंगनाचा दावा धादांत खोटा | हे आहे सत्य
मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. कंगनानं केलेल्या नव्या विधानांची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ‘मी शिवसेनेला मतदान केले आणि ते माझ्यासोबत असे वागत आहेत,’ असं तिने म्हटलं आहे. मात्र कंगनाचं नाव ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथून भाजपाचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान कसं केलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या मागील सत्य वेगळं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Fact Check | अमिताभ बच्चन यांची दाऊद सोबत मैत्री | अशोक चव्हाण यांचा फोटो वापरून खोटी माहिती
बॉलीवूड अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांनी संसदमध्ये बॉलीवूड-ड्रग्स प्रकरणावर दिलेल्या वक्तव्यावर पूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकासोबत हात मिळवत असताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत लोक दावा करत आहे की बिग बींसोबत दिसत असलेली व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.
3 वर्षांपूर्वी -
माध्यमांकडून फेक न्यूज | चिनी सैनिकांच्या कबरी १९६२ मधील | जोडली गलवान खोऱ्याशी
गलवान खोऱ्यात १५ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या भीषण सामोरामुळे २० भारतीय सैन्य जवान ठार झाले. दुसरीकडे, चिनच्या बाजूने नेमकं काय नुकसान झालं याची कोणतीही अधिकृत माहिती चीन सरकारकडून देण्यात आली नव्हती. केवळ निरनिराळ्या बाजूनी अंदाज बांधण्यात आले होते, ज्याला कोणताही पुरावा नव्हता. भारतीय माध्यमांनी देखील केवळ अंदाजच मांडले होते. मात्र आता भारतीय माध्यमांना याच विषयाला अनुसरून चुकीचे फोटो प्रसिद्ध करून फेक न्युज पसरविण्यास सुरुवात केली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Numerology Horoscope | 19 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Magellanic Cloud Share Price | लॉटरी लागली! या कंपनीच्या एका शेअरवर 3 फ्री शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा, फायदा उचला
-
Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?
-
Gold Price Today | सोन्याच्या किंमती विक्रम रचणार, पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर जाणार? ऍक्झॅक्ट आकडा पहा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Varun Beverages Share Price | लॉटरी शेअर! तब्बल 1078 टक्के परतावा दिला, आता अजून तेजीत येतोय, खरेदीचा सल्ला
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला