12 December 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Google Pixel 6a | लाँचिंगपूर्वी समोर आली गुगल पिक्सल 6a स्मार्टफोनची किंमत, भारतात लाँच होण्यास सज्ज

Google Pixel 6a

Google Pixel 6a | गुगल आपला पिक्सेल ६ ए भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हा फोन भारतात लाँच होऊ शकतो, असं म्हटलं जात असून या स्मार्टफोनची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. गुगलने यावर्षी झालेल्या गुगल आय/ओ इव्हेंट दरम्यान पिक्सेल ६ ए ची घोषणा केली. पिक्सेल ६ ए मध्येही कंपनीच्या पिक्सल ६ सीरीज प्रमाणेच डिझाइन आहे. बराच काळ या फोनची चर्चा सुरू असून, याच दरम्यान त्याच्या किंमतीची माहिती समोर आली आहे.

पिक्सल 6 ए ची किंमत किती :
टिप्स्टर अभिषेक यादवने ट्विटरवर पिक्सल 6 ए ची किंमत जाहीर केली आहे. टिप्स्टरनुसार, भारतात पिक्सल 6 ए ची किंमत सुमारे 37,000 रुपये असेल. याआधी अशीच माहिती इतर काही रिपोर्टमध्ये मिळाली होती आणि या डिव्हाइसची किंमत 40 हजार रुपये असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार :
गुगलने पिक्सेल 6 ए च्या लाँचिंगची तारीख निश्चित केली नसली तरी रिपोर्टनुसार या महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन लाँच होणार असून फ्लिपकार्टच्या माध्यमातून याची विक्री होणार आहे. जाणून घेऊयात गुगल पिक्सेल 6a चे फिचर्स कसे मिळतील.

6.1 इंचाचा फुल-एचडी + ओएलईडी डिस्प्ले :
गुगल पिक्सल 6 ए मध्ये 6.1 इंचाचा फुल-एचडी + ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1080 x 2400 पिक्सल रेझोल्यूशनसह येतो. याचे आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. प्रोटेक्शनसाठी हा फोन कॉर्निंग गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनसोबत येतो. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज असून, फोन ऑक्टा-कोर गुगल टेन्सर एसओसीने सुसज्ज आहे. गुगल पिक्सेल ६ ए अँड्रॉइड १२ वर काम करते. यात 6 जीबी एलपीडीडीआर 5 रॅम असून गुगल फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.

कॅमेरा आणि बॅटरी :
गुगल पिक्सल ६ ए मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १२.२ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा अल्ट्रा-वाइड अँगल असलेला 12 मेगापिक्सलचा लेन्स आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

4410 एमएएचची बॅटरी :
पॉवरसाठी, यात 4410 एमएएचची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीचा एक प्रकार म्हणून यात 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6 ई, ब्लूटूथ 5.2 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Google Pixel 6a smartphone price in India check details 20 July 2022.

हॅशटॅग्स

#Google Pixel 6a(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x