14 December 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Tecno Camon 19 Neo | टेक्नो बजेट कॅमॉन 19 निओ स्मार्टफोन लाँच | 32 एमपी सेल्फी कॅमेरा

Tecno Camon 19 Neo

Tecno Camon 19 Neo | टेकनोने आपला नवीन स्मार्टफोन टेकनो कॅमॉन १९ निओ बाजारात लाँच केला आहे. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन नुकताच टेक्नोने बांगलादेशात लाँच केला आहे. हे ६ जीबी रॅम + १२८ जीबीच्या सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येते.

भारतातही लवकरच उपलब्ध :
बांगलादेशात याची किंमत बीडीटी १८,४९० (सुमारे १५,३०० रुपये) आहे. बांगलादेशमध्ये या फोनची विक्री सुरू झाली आहे. भारतासह अन्य बाजारातही कंपनी लवकरच उपलब्ध करून देऊ शकते. सध्या या फोनमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊयात.

स्मार्टफोनची वैशिष्ट्ये :
फोनमध्ये कंपनी पंच-होल डिझाइनसह 6.8 इंचाचा फुल एचडी + आयपीएस एलसीडी पॅनल देत आहे. हा डिस्प्ले ९० हर्ट्जच्या रिफ्रेश रेटसह येतो. टेक्नोचा हा लेटेस्ट फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी 85 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल :
फोनच्या रियरमध्ये देण्यात आलेला प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये तुम्हाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉयड 12 वर आधारित टेक्नोच्या हायओएस यूआयवर काम करतो.

साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर :
साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये वाय-फाय ८०२.११ ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, ४जी एलटीई आणि यूएसबी टाइप-सी असे पर्याय मिळतील. कंपनीचा हा फोन ब्लॅक, सिल्वर आणि ग्रीन अशा तीन कलर ऑप्शनमध्ये येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tecno Camon 19 Neo smartphone launched check details 14 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x