26 April 2024 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

Health First | तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे दहा फायदे

Drinking water, Copper pot, health article

मुंबई, १६ मार्च: धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानलं जातं. त्यातही तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजलं जातं. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्याचं तुम्हाला माहित आहे. पण असं केल्यास आरोग्याला नेमका काय फायदा होतो, हे तुम्हाला माहित आहे का?

रोज सकाळी पाणी प्यावे हे घरातले त्याचबरोबर डॉक्टर देखील सांगतात. पण पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.

  1. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे. त्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात आणि क्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते. अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो.
  2. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं.
  3. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.
  4. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.
  5. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.
  6. पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.
  7. शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.
  8. अॅनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने फायदा होतो. हे पाणी लोह सहजरित्या शोषून घेतं. त्यामुळे अॅनिमिया असणाऱ्यांसाठी हे पाणी पिणं आवश्यक आहे.
  9. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे फोड्या, तारुण्यापीटिका तसंच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते.
  10. तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारुन पचनशक्ती वाढवतं. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते.
  11. तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरतं.

महत्वाची टीप: पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अ‍ॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

 

News English Summary: Eating and drinking in a metal pot has long been believed to be beneficial to the body. The copper vessel is also considered to be very pure. You know, people in many homes drink water from copper pots. But do you know the health benefits of doing so?

News English Title: Drinking water in a copper pot is beneficial for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x