20 April 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | गाढ झोप लागण्यासाठी करा हे उपाय

Good sleep, At night, health article

मुंबई, ०२ मार्च: आपल्या रोजच्या धावपळीत, घाईगडबडीत आपल्याला सर्वाधिक ताजेतवाने ठेवण्यात कशाची सर्वाधिक मदत होत असेल तर झोपेची. दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर गाढ झोप लागली तरच दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटते आणि कामाचा उत्साह संचारतो. पण जर रात्री झोप नीट लागलीच नाही, तर दुसऱ्या दिवशी कोणत्याच कामात उत्साह जाणवत नाही. यामुळेच झोपेच महत्त्व रोजच्या दिनक्रमात अनन्यसाधारण आहे. (What to do for good sleep at night health article)

बदलत्या जीवनशैलीमध्ये झोपच नीट लागत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. काहींना निद्रानाशाचा त्रास असतो, तर काहींना अपुरी झोप होण्याचा. रात्री शांत झोप लागून सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटण्यासाठी फार काही वेगळे उपाय करण्याची गरज नाही. काही सामान्य उपायांच्या साह्यानेही कोणालाही शांत झोप लागू शकते. शांत झोप लागण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. ते कोणते हे जाणून घेऊया.

वेळ निश्चित करा :
शांत झोप लागण्यासाठी सर्वात आधीच तुमच्या झोपण्याची वेळ निश्चित करा. त्याचबरोबर जी वेळ निश्चित केली आहे, त्याचे पालन करण्याची काळजी घ्या. काही लोकांना रात्री विनाकारण जागरण करण्याची सवय असते. रात्री उशीरा झोपून सकाळी लवकर उठायला लागले, तर कोणालाही फ्रेश वाटणार नाही, हे तर निश्चित आहे.

आपला आहार तपासा :
एकाचवेळी पचन आणि झोप या दोन्ही गोष्टी करण्याची आपल्या शरीराची तयारी नसते. त्यामुळेच तुम्हाला खूप भूक लागली असेल, तर संध्याकाळी लवकर जेवून घ्या. पोटभर जेवल्यावर लगेचच झोपू नका. जर खूप झोप आली असेल, तर पोटभर जेऊ नका. काही पदार्थांमध्येही चांगली झोप आणण्याचे गुणधर्म असतात. ज्यामध्ये दूध, केळ, मध, बदाम यांचा समावेश होतो. या पदार्थांचे सेवन करा.

पेयपान :
जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल, तर झोपण्यापूर्वी चहा, कॉफी यांचे सेवन करणे टाळा. त्यामुळे तुम्हाला झोप न लागण्याची शक्यता आहे किंवा जाग येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अल्कोहोलच्या सेवनामुळेही झोपण्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला अल्कोहोलचे सेवन करायचे असेल, तर ते लवकर करा आणि योग्य प्रमाणात करा. नाहीतर तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.

वातावरण हवे :
झोपण्यासाठी आवश्यक वातावरण असले पाहिजे. ज्या खोलीमध्ये तुम्ही झोपणार आहात, तिथे पुरेसा अंधार आणि शांतता असणे गरजेचे आहे. जिथे तुम्ही झोपणार आहात, तो पलंगही आरामदायी असला पाहिजे. या गोष्टींचीही काळजी घ्या.

मोकळे व्हा :
झोपण्यापूर्वी मनात कोणतीही चिंता ठेवू नका. जर मनात कोणती चिंता असेल, तर शांत झोप लागणार नाही. त्यामुळे मनात ज्या चिंता असतील त्यावर सकारात्मक विचार करा. तुम्ही आशादायी असाल, तर प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघू शकतो. त्यामुळे नकारात्मक विचार करू नका. त्यामुळे शांत झोप लागू शकते.

 

News English Summary: In your daily routine, sleep is what helps keep you most refreshed in a hurry. Only when you get tired after working all day and come home, you feel refreshed the next day and the excitement of work spreads. But if you don’t get enough sleep at night, you don’t feel good about any work the next day. This is why the importance of sleep is unique in the daily routine.

News English Title: What to do for good sleep at night health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x