महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक शक्य तितक्या लवकर भाजपात 'गट' म्हणून विलीन करणं हेच शिंदेंना लक्ष दिलंय?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारची आज खरी परीक्षा असणार आहे. कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झालेले असताना राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असून, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झटका दिलाय.
11 महिन्यांपूर्वी -
सुरतमधून राज्य सरकार पाडलं | आता राज्य सरकारही परराज्यातून ऑपरेट होणार? | हा प्रकल्प वेगाने मार्गी लावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा फास्टट्रॅकवर येणार आहे. तसेच राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही उचलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
कडवट दाक्षिणात्य नेते | महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा | मग मी मोदी सरकारच पाडून दाखवतो - मुख्यमंत्री केसीआर
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन भाजपाच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहे. राज्यातील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची औपचारिक सुरूवात काल (शनिवार) झाली होती. बैठकीच्या दिवशी बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सर्वाधिक चर्चा होती. त्याचं कारण होतं अमित शाहा यांनी शेवटच्या क्षणी केलेला राजकीय खेळ आणि त्यानंतर फडणवीस समर्थकांमध्ये उमटलेले पडसाद.
11 महिन्यांपूर्वी -
Save Aarey Forest | आरे जंगल वाचवण्यासाठी तरुणांची पुन्हा आंदोलनाची तयारी | शिंदे सरकार विरोधात संताप वाढणार
महाराष्ट्रात पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आरे कॉलनीचं जंगल वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड न बांधण्याचा उद्धव सरकारचा निर्णय मागे घेतला, हे आपण जाणून घेऊया. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्ते संतापले असून, त्याविरोधात नव्याने लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे. १८०० एकरात पसरलेल्या या आरे फॉरेस्टला अनेकदा ‘मुंबईचं फुफ्फुस’ असं संबोधलं जातं. आरेच्या जंगलात बिबट्यांव्यतिरिक्त सुमारे 300 प्रजातीचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडलेले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Rahul Narvekar | अध्यक्ष महोदय तुमचं अभिनंदन, पण किती दिवस पदावर राहाल माहित नाही- सुनील प्रभू
विधानसभेत शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
शिंदेंच्या गुजरात, गोवा, गुवाहाटी, सागर बंगला ते राजभवनावर भेटी | स्व. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाकडे फिरकलेच नाही
विधानसभेत आज उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा पहिला सामना रंगतोय. कारण विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आज रंगते आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राजन साळवी यांना शिवसेनेचे उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून राजन साळवी ओळखले जातात.
11 महिन्यांपूर्वी -
शिंदेजी! या नीच, लबाड राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहा | अनिल गोटेंचा मुख्यमंत्री शिंदेंना पत्रातून सल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील.
11 महिन्यांपूर्वी -
शिंदे यांनी पुढील काळात वेगळी भूमिका घेतली तर आमचं वेगळे ठरेल | शिंदे गटाचे आपसात इशारे सुरु
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांबद्दल गोड बोलून दोघांना माजी मुख्यमंत्री केलं | तर मराठा म्हणत चंद्रकांतदादांचा पत्ता कट?
राज्यात भाजप-शिंदे गट युतीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असून, सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिंदे गटातून माजी मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागणार असल्याचं म्हटलं जातंय. तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे दावेदार असल्याची चर्चा रंगलीये.
11 महिन्यांपूर्वी -
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी | शिवसेनेशी संबंध संपला
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
शिंदेंना मुख्यमंत्री करून फडणवीसांना दुय्यम स्थान | फडणवीसांचे राजकीय पंख 3 प्रमुख नेतेच छाटणार? - सविस्तर वृत्त
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर सरकार पडणार हे निश्चित होतं. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती शिंदे आणि भाजप यांचं सरकार येणार याची. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केलं. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
11 महिन्यांपूर्वी -
फडणवीस समर्थकांमध्ये अमित शाहांबद्दल खदखद वाढली | फलकांवरून अमित शाहांचे फोटो हटवले
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले होर्डिंग नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे.
11 महिन्यांपूर्वी -
केंद्राला फडणवीसांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं | प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यातील लोकांबरोबरच राजकीय मंडळींनाही हा धक्का होता. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीतील लोकांनी गेम केला अशी चर्चा कालपासून राज्यामध्ये आहे. यासंपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून | फडणवीसांचा पत्ता अमित शाहांनी कापल्याची चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. सगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यानंतर उत्सुकता होती ती शिंदे गटाच्या साथीने भाजप सत्तेत येणार याची. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील ही चर्चाही रंगली होती. ३० जूनच्या दुपारपर्यंत हीच चर्चा सगळीकडे रंगली होती. अगदी भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलनेही मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची कविता ट्विट करून या सगळ्या घडामोडींना एक अर्थ दिला.
11 महिन्यांपूर्वी -
फडणवीस यांचं दिल्लीतील भाजप वरिष्ठांकडून खच्चीकरण सुरु | ब्राम्हण महासंघाचा भाजपवर धक्कादायक आरोप
महाराष्ट्राचे राजकारण सतत नवनवे राजकीय वळण घेत आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्याची घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला, मग देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये भाग घेतला नाही. पण फडणवीस सरकारमध्ये सहभागी न होण्याबाबतची चर्चा शांत झाली का, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतून आदेश जारी केले.
11 महिन्यांपूर्वी -
कालच महाराष्ट्रनामाने सांगितलं ते आजच झालं | मेट्रो कारशेड आरेतच | मुंबईच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची सुरुवात
महाराष्ट्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याची कसरत सुरू झाली आहे. गुरुवारी नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर राज्य सरकारने मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड बांधकाम प्रकरणी नव्या सरकारने महाराष्ट्र सरकारला आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेच्या आ. राजू पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळणार? | अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.
11 महिन्यांपूर्वी -
भाजप आणि फडणवीसांचा दिलदारपणा? | थांबा! राजकीय गेम पुढे आहे | शिंदेंच्या खांद्यावर बंदूक का? | काय आहे संपूर्ण योजना
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसंच मी सरकारच्या बाहेर असणार आहे असंही त्यांनी सांगितलं तोच हा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं तसंच उपमुख्यमंत्री व्हावं याकरिता आम्ही आग्रही आहोत असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Eknath Shinde | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार | फडणवीस बाहेरून नियंत्रण ठेवतील
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात आजच शपथ घेणार
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन पळून गेले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
-
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
-
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
-
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
-
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
-
RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता
-
Abbott India Share Price | 'ऍबॉट इंडिया'च्या गुंतवणुकदारांना मिळणार बंपर लाभांश, होणार मजबूत फायदा
-
Repro India Share Price | एका आठवड्यात 'रेप्रो इंडिया' कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
-
Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा
-
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा