11 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

TET Scam | टीईटी परीक्षा घोटाळा, शिंदे गटातील मंत्र्यांचं पितळ उघडं पडलं, सत्तारांच्या मुलींची नावं शासकीय वेबसाइटवर

TET Scam

TET Scam | टीईटी परीक्षा घोटाळ्यात माझ्या मुलींचा काहीही संबंध नसून कुणीतरी त्यात ही नावं घुसडल्याचा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार सतत्याने सांगत आहेत. पण परिक्षा परिषदेच्या महाटीईटी या शासकीय वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या यादीतच सत्तारांच्या मुलींची नावं आढळून आल्याने सगळंच पितळ उघडं पडलं आहे.

टीईटी परीक्षा घोटाळ्यात मंञी अब्दुल सत्तारांच्या दोन मुली अपाञ ठरल्याचं सगळेच जण सांगताहेत पण या घोटाळ्यात सत्तारांच्या मुलींवर नेमकं काय आरोप झालेत हे आजवर समोर आलं नव्हतं. मात्र आता मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांना आता बेकायदेशीर ठरवले आहे.

टीईटी घोटाळ्यात सत्तारांच्या मुलींवर आरोप काय :
* टीईटी परीक्षा 2019 घोटाळ्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेकडून अपाञ परीक्षार्थींच्या एकूण 3 याद्या प्रसिध्द
* पहिली यादी 7500 अपाञ मुलांची यासर्वांवर पेपरमध्ये फेरफारीचा आरोप
* तर दुसरी यादी ही 293 जणांची… ‘परिशिष्ट ब’ च्या यादीत सत्तारांच्या मुलींचा समावेश
* ‘परिशिष्ट ब’ यादीतील मुलं ही नापास असूनही त्यांनी बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवणाल्याचा आरोप!
* म्हणजेच TET 2019च्या परिक्षेत सत्तारांच्या मुली नापास झाल्या होत्या! तरीही त्यांनी एजंट करवी बनावट प्रमाणपत्र पञ मिळवल्याचा आरोप!
* एकूण 293 परिक्षार्थींनी तत्कालीन परीक्षा आयुक्त तुकाराम सुपेकडून ही बनावट प्रमाणपत्र मिळवली होती
* विशेष म्हणजे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या या 293 जणांचा परीक्षा परीषदेच्या अंतिम निकालात कुठेही समावेश नव्हता!

आता एवढा ढळढळीत पुरावा शासकीय वेबसाइटवर उपलब्ध असतानाही मंञी अब्दुल सत्तार आपल्या मुलींवरील आरोप फेटाळत असतील तर याचा अर्थ असा होतो की, मंञ्यांच्याच आपल्या शासकीय यंञणेवर विश्वास नाही असंच म्हणावं लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: TET Scam Minister Abdul Sattar in danger zone over TET Exam Scam check details 26 August 2022.

हॅशटॅग्स

#TET Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x