5 May 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

चीनने आपली जमीन बळकावली आहे | ही सुद्धा देवाची करणीच का - राहुल गांधी

Act Of God, Rahul Gandhi, PM Narendra Modi, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर : पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे का? चीनने आपली जमीन घेतली आहे. सरकारकडे ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची काही योजना आहे का? की याला पण आता अ‍ॅक्ट ऑफ गॉडच म्हणायचं?,” असे ट्विट राहुल यांनी केलं आहे.

दरम्यान, चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर आलेले भारत आणि चीनचे सैन्य यामुळे लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी आणि सैन्य हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत आणि चीनमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील नेत्यांनी सर्वसहमतीच्यामाध्यमातून काम केले पाहिजे. तसेच परस्परांमधील मतभेदांना विवादाचे रूप देता कामा नये, या मुद्द्यावर सहमती व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Is China’s occupation of its territory also an act of God? China has taken our land. Does the government have any plans to reclaim the land? Do you want to call it an act of God now ?, tweeted Rahul Gandhi.

News English Title: Chinese Have Taken Our Land Is Act Of God Asks Rahul Gandhi Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x