28 April 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भाजप कार्यकर्त्यांचे स्टंट! रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले तिथेही मोदींच्या नावाने घोषणा

Priyanka gandhi, robert vadra, Narendra Modi, Loksabha Election 2019

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या उतावळ्या कार्यकर्त्यांचं आजदेखील पुन्हा दर्शन झालं. एखादी गोष्ट कोणत्या ठिकाणी करावी याचं देखील त्यांना भान नसतं असाच काहीसा प्रकार आज घडला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान देखील पार पडलं आहे. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील सुप्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान वाड्रा देवदर्शन घेऊन परतत असताना ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या, त्या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, म्हणून आम्ही घोषणा दिल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांनी घोषणा देणाऱ्या लोकांना तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात का? असे विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही भाजपचे लोक आहोत. परंतु आम्ही स्वतःहून घोषणा दिल्या आहेत. आम्हाला कोणीही घोषणा देण्यास सांगितले नव्हते अशी आधीच सारवासारव केली आणि अप्रत्यक्षरित्या यामागे कोणीतरी असल्याचा पुरावाच दिला.

तसेच यावेळी प्रसार माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशीदेखील संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन देशभरातलं वातावरण तापलेलं आहे. याबाबत वाड्रा यांनादेखील माध्यमांनी विचारणा केली. परंतु यावर वाड्रा म्हणाले की, मी मंदिरात देवदर्शनासाठी आलो आहे, चांगलं दर्शनदेखील झालं आहे. त्यामुळे यावेळी मी राजकारणावर काहीही बोलणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x