20 April 2024 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

'अब कि बार ट्रम्प सरकार' नारा देणाऱ्या मोदींकडूनही जो बायडन यांचं अभिनंदन

US President Joe Biden, US Chief Justice, Oath ceremony, Capitol Hill

वॉशिंग्टन, २० जानेवारी: डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधी समारंभास अनुपस्थित राहिले. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स हे मात्र उपस्थित होते. याशिवाय बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा हे माजी अध्यक्षही सपत्नीक उपस्थित होते. लेडी गागा, जेनिफर लोपेझ अशा अनेक कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले. बायडेन यांचे भाषण भारतीय वंशाचे सहायक विनय रेड्डी यांनी लिहिले होते.

दरम्यान अमेरिकन निवडणुकीच्या वेळी ट्रम्प यांच्यासाठी अघोषित मार्केटिंग करणाऱ्या मोदींनी देखील बायडेन यांचं अभिनंदन केलं आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले,”भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Democratic leader Joe Biden has been sworn in as the 46th president of the United States. Biden was sworn in as US Chief Justice at a ceremony at Capitol Hill in Washington.

News English Title: Biden was sworn in as US Chief Justice at a ceremony at Capitol Hill in Washington news updates.

हॅशटॅग्स

#JoeBiden(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x