15 December 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

कोरोना आपत्ती: अमेरिकेत २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू

Corona Crisis, Covid19, America

न्यूयॉर्क, ६ एप्रिल: जगभरात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असून याठिकाणी मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाने १२०० नागरिकांचा बळी घेतला आहे.

अमेरिकेत ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत ३,३७,२७४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या २४ तासांत अमेरिकेत १२०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा ९,६३३ झाला आहे.

दरम्यान, न्यूयॉर्कमधील ब्रोन्क्स प्राणिसंग्रहालयातील वाघ करोनाच्या संसर्गाने आजारी झाला आहे. नादिया नावाच्या चार वर्षाच्या मलेशियन वाघिणीला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. या वाघिणीला आणि अन्य तीन सिंहाना सुखा खोकल्याचा त्रास होत असल्याचे प्राणिसंग्रहालय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वाघिणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. या प्राणिसंग्रहालयाची देखभाल करणाऱ्या वन्यजीव संरक्षण सोसायटीने एका निवेदनाद्वारे याची माहिती देण्यात आली.

 

News English Summary: The worldwide outbreak of corona virus is increasing day by day. Corona has the highest prevalence in the United States, and the death toll is increasing. Corona has killed 1200 civilians in the United States in the past 24 hours. More than 3 million people in the United States have been exposed to the Corona virus. According to statistics, 3,37,274 people in the United States are infected with coronas. The death toll in the United States has risen to 9,633.

 

News English Title: Story America Corona virus deaths top 1200 in last 24 hours Covid19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x