खा. श्रीकांत शिंदेची अँब्युलन्स सेवा | वडील PWD मंत्री | गाडी टोल कंपनीच्या नावावर
कल्याण, २७ ऑगस्ट : राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने कल्याण-डोंबिवली मनपाला ९ रुग्णवाहिका, उल्हासनगर मनपाला ८ रुग्णवाहिका, अंबरनाथ नगरपरिषदेला ५ रुग्णवाहिका आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेला ५ रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते लोकर्पण करण्यात आले.
याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाज माध्यमांवर माहिती देताना म्हटले होते की, आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांनी आणि पुनित गोयंका, आनंद राठी आणि दिपक फर्टिलायझर्स यांच्या सहकार्यांने या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एमएमआर क्षेत्रासाठी आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्या वतीने एकूण ७५ मोफत रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करुन दिल्या असून कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याकरिता या रुग्णवाहिकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे असं ,म्हटलं होतं.
मात्र याबाबत मनसेच्या मीडियासेलने धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे. त्यानुसार यातील काही अँब्युलन्स या सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येणाऱ्या रोड काँट्रॅक्टरच्या नावावर दिसत आहेत. उदाहरणार्थ, MH.03 CV7735 ही अँब्युलन्स Modern Road Makers P Ltd या टोल कंपनीच्या नावावर असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. त्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या या टोल कंपनीच्या कामाचं आणि त्यांच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरील विशेष मेहेरबानीचं गुपित काय असावं याची चर्चा रंगली आहे.
लवकरच मुंबईमध्ये २ दिवसांचं पावसाळी अधिवेशन भरणार आहे आणि त्यावेळी विरोधकांनी हाच विषय उचलून धरल्यास ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचं मंत्रिपद धोक्यात येऊ शकतं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी राज्य टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र इथे एकूण रेकॉर्ड तपासल्यास थॅकरे सरकारमध्ये ‘टोलचा-झोल’ तर नाही ना अशी चर्चा विरोधकांमध्ये सुरु झाल्यास नवल वाटणार नाही.
News English Summary: MNS’s media cell has brought shocking information to light. According to him, some of these ambulances are in the name of the road contractor coming under the Public Works Department. For example, the ambulance MH.03 CV7735 appears to be in the name of a toll company called Modern Road Makers P Ltd.
News English Title: Ambulance service provided by Shivsena MP shrikant Shinde is showing owner of vehicles on Road contractors name Modern Road Makers Private Limited News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC