29 March 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

IAS-IPS अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात | त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात

Devendra Fadnavis

मुंबई, ०७ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर बेछूट आरोप केले जात आहेत. हे आरोप करण्याआधी काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात आणि कारवाई देखील सुरू होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

IAS-IPS अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात, त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात – IAS IPS officers meet Devendra Fadnavis before making allegations said minister Nawab Malik :

भारतीय जनता पक्षाकडून केंद्रातील सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले, ‘काही आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कट कारस्थान करून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर, देशामध्ये ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही. अशा राज्यांमध्ये केंद्र सरकार अशा प्रकारचे षडयंत्र करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला. आघाडी सरकार मधील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी या सर्व नेत्यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: IAS IPS officers meet Devendra Fadnavis before making allegations said minister Nawab Malik.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x