14 December 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी | त्यांचा पराभव होईल अशी भक्कम आघाडी

Minister Jayant Patil, Devendra Fadnavis, MLC election result, MahaVikas Aghadi

सांगली, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू” (We understood power of MahaVikas Aghadi and next time we will contest election with new strategy).

महाविकास आघाडीच्या यशानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस (Operation Lotus)वगैरेच्या वल्गना केल्या जात होत्या. तीन चाकी सरकार असं हिणवलं जात होतं. पण महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लक्षात आली असेल. फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होईल इतकी भक्कम आघाडी आमची आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

 

News English Summary: After the success of Mahavikas Aghadi, NCP leader Jayant Patil has slammed Fadnavis. “Operation Lotus etc. were being abandoned in Maharashtra. The three-wheeled government was being weakened. But the Bharatiya Janata Party (BJP) must have realized the strength of the Mahavikas Aghadi in this election. Yes, “said Jayant Patil.

News English Title: Minister Jayant Patil challenge Devendra Fadnavis after MLC election result news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x