महत्वाच्या बातम्या
-
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी खुशखबर | राज्यातील १० लाख कामगारांना लाभ मिळणार
कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन वाढतच गेला. त्यामुळे उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली होती. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतलं होता आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
पक्षाची धुरा संभाळणाऱ्यांना अनेकदा कटू बोलावे लागते | सेनेकडून पवारांचं समर्थन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याच्या भूमिकेवरुन जाहीर भाष्य केले. त्यानंतर पार्थ कमालीचा नाराज झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी बहीण खासदार सुप्रिया सुळे गेल्यात. त्यांच्यात काय चर्चा झाली ती पुढे आलेली नाही. पार्थ हे अजित पवार यांचे चिरंजीव. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने पार्थसह अजितदादा नाराज होते. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. त्यावेळी अजित पवार यांची समजूत काढत मनधरणी केल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आताही शरद पवार यांनी नातू पार्थ याला शाब्दीक फटकरल्यानंतर कटुतेची भावना वाढीस लागली. यावरुन दोन दिवस बैठका होत आहेत. आता शिवसेनेने पार्थ पवार लहान आहेत. ते राजकारणात नवीन आहेत, असे सांगत शरद पवार वेगळ वागले नाहीत, असे शिवसेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारमधील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला - चंद्रकांत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची मोहिते-पाटील पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या पिता-पुत्रांनी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांना त्यांचे जाणे जिव्हारी लागले होते. पण आता सत्तेत आल्यानंतर पवारांनी या पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती आखली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीसाठी पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत
राष्ट्रवादीचे प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
एका ट्विटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला | पण मी ती चूक सुधारली
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
नीट परीक्षेमुळे MPSC राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली.
5 वर्षांपूर्वी -
पार्थ पवारांचं जय श्रीराम ते CBI | शरद पवारांनी त्यांच्याबद्दल इतकी टोकाची प्रतिक्रिया का दिली?
सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाची घोषणा होताच शरद पवार यांनी मंदिर उभारणीमुळे कोरोना पळून जाईल, अशी काहींची समजूत आहे, असे मत व्यक्त केले. मात्र पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ कोरोना रुग्णांची नोंद | २५६ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के इतका आहे.
5 वर्षांपूर्वी -
महावितरणला मनसे झटका | मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले
महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. अगदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही फटका बसला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
खा. नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्याच्या निर्णय
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत त्यांच्या घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ९,१८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २९३ रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात ९ हजार १८१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात २९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण सतत वाढतं आहे. परंतु यात एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही सतत वाढतं आहे. आज एका दिवसात राज्यात ६ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही | ही आहे पुढील सुनावणीची तारीख
राज्यावर करोनाच्या संकटामुळे उद्भवलेला विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगानं ६ जुलै रोजी नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ‘यूजीसी’च्या नव्या मार्गदर्शक सूचनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून, या याचिकांवर सुनावणी पार पडली, मात्र पुढील सुनावणी १४ तारखेला पार पडणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधीच भाजपकडून राष्ट्रवादीला धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र त्यापूर्वीच भाजपने राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रासंबंधित धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच | ऑनलाईन दर्शनाची सुविधा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने होत असून सार्वजनिक गणेशोत्सवास सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी स्वत;हून पुढाकार घेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध दगडूशेठ गणपती ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे, गेल्या 127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांसाठी राणेंचा पुढाकार | फडणवीसांच्या हस्ते अत्याधुनिक कोविड-१९ लॅबचे लोकार्पण
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे कसाल येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कोविड 19 लॅबचे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि खा. नारायण राणे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील संबोधित केलं.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्या नावातच गुलाब आहे, त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये - आ. नितेश राणे
नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या कार्यसम्राट नगरसेवकाची पक्षांतर्गत गळचेपी | समाज माध्यमांवर घुसमट व्यक्त केली
पुणे मनसेतील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी समाज माध्यमांवर पक्षांतर्गत होणारी घुसमट व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्यानंतर नगरसेवक वसंत मोरे हेच मनसेची ओळख असल्याचं सर्वश्रुत आहे. केवळ लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेली विकास कामं एवढीच त्यांची ओळख नसून, स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते देखील आपल्यासोबत राजकारणात कसे मोठे होतील यासाठी कार्यशाळा घेणारे नगरसेवक ही देखील त्यांची ख्याती आहे. त्यामुळे जमिनीवर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता वसंत मोरे यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशीभविष्य | सोमवार १० ऑगस्ट २०२०
आजचे राशीभविष्य | सोमवार १० ऑगस्ट २०२०
5 वर्षांपूर्वी -
Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN