महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या मागे जाणारे मतदारच नालायक: प्रकाश आंबेडकर
भारतीय जनता पक्षाच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेत भावनिक मुद्यांवरून मतदाराला मूर्ख बनवणारे राजकारणी आता कलम ३७० घेऊन सज्ज
अमित शहांच्या बीडमधील पहिल्या भाषणातील मुख्य रोख हा काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यावर होता. तसेच भाषणात त्यांनी मराठवाडा आणि बीडमधील महत्वाच्या विषयांना आणि सामान्य मतदाराच्या दैनंदिन आयुष्यातील मुख्य मुद्यांना पूर्णपणे बगल दिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे भाजपने संपूर्ण मराठवाड्यात आणि बीडमध्ये सत्ताकाळात नेमका काय विकास केला यावर चकार शब्द न काढता, काश्मीर, भगवान बाबा आणि भारत माता की जय अशा घोषणा देत केवळ भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते.
6 वर्षांपूर्वी -
बेरोजगारांना संधी कशी देता येईल याच्यासाठी शिवसेना काम करत आहे: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. संगमनेरमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपाला तब्बल ३० जागांवर बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता
राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भारतीय जनता पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, भाजपला दारात सुद्धा उभं करू नका: शरद पवारांचं आवाहन
भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाही. यांच्या राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की यांनी कांदा निर्यातबंदी करून टाकली. या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यांना मतदानासाठी दारातही उभे करू नका,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांना केलं.
6 वर्षांपूर्वी -
बीडच्या समस्या राहिल्या दूर; घरोघरी जाऊन कलम ३७०बद्दल सांगण्याची शहांची अजब सूचना
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
6 वर्षांपूर्वी -
शहांकडून 'बोला भारत माता की जय' आडून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या विषयांना बगल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र विधानसभा: अमित शहांचा अजब प्रचार; सभा बीड'मध्ये आणि तुणतुणं काश्मीरचं
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आघाडीचा 'शपथनामा' प्रसिद्ध, बेरोजगारांना ५ हजार 'बेरोजगारी भत्ता'
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपला शपथनामा अर्थात जाहीरनामा सोमवारी मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला.या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य अशा ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, अनिल गोटे, एकनाथ गायकवाड उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी १३१ जागा तर काँग्रेस आणि मित्र १५७ जागा लढणार आहे. लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे हे आघाडीकडून धुळे मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा डोंगर तब्बल ४.७१ लाख कोटींवर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मागील ५ वर्षात राज्याचा कसा विकास झाला याचा प्रचार करत आहेत. तर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या अपयशाचा पाठा वाचत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या २० तारखेपर्यंत बरेच आरोप प्रत्यारोप होणार याच शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी दिवसरात्र एक करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर पोहोचवल्याचा दावा फडणवीस करत आहेत. पण राज्याच्या विकासाची दुसरी बाजू देखील आहे.
6 वर्षांपूर्वी -
पिंपरी: राज यांच्या सभेकडे प्रसार माध्यमं केंद्रित होण्याच्या चिंतेने उद्धव यांची सभा रद्द?
निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टोकाला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार होते.
6 वर्षांपूर्वी -
बंडखोरांना शांत करण्याचा भाजप-सेनेकडे शेवटचा दिवस
भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी राज्यात युतीसाठी पूरक असे वातावरण सध्यस्थितीत दिसत नाही. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप पक्षाच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. या बंडखोरांचा फार मोठा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांना असणार आहे. दरम्यान, आज म्हणजे सोमवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज बंडखोरांची मनधरणी करण्यात शिवेसेना आणि भाजपला यश आले नाही, तर त्याचा मोठा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडून सहकारी पक्ष हॅक; कमळावर निवडणूक
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
6 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: मोदींच्या राज्यात ९ सभा; पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी ९ मिनिटं वेळ नव्हता
विधानसभा निवडणुकीचा प्रचार १-२ दिवसात सुरु होणार असून सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाका लागणार आहे. त्यात निवडणुका म्हटलं की भारतीय जनता पक्षासाठी सणच म्हणावा लागेल. अगदी कोल्हापूर-सांगली अतिवृष्टीमुळे पाण्यात बुडालेली असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेत मग्न होते आणि प्रसार माध्यमांनी विषय उचलताच काही दिवसांसाठी यात्रा थांबवली आणि २-३ दिवसात पुन्हा निवडणुकीची यात्रा सुरु केली.
6 वर्षांपूर्वी -
भुसावळ गोळीबाराने हादरले, भाजप नगरसेवकासह चौघांचा मृत्यू
पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी २०१४साली शपथपत्रात लपवलेल्या २ गुन्हे प्रकरणांची नोंद २०१९च्या शपथपत्रात
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांची संपत्ती ही तब्बल १०७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या नावावर चार प्रलंबित प्रकरणांची नोंद देखील दाखविण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चौथ्या यादीत खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचा पत्ता कट
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे. वेटिंगवर असलेल्या दिग्गजांपैकी भाजपनं केवळ एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत एकूण ४८ उमेदवार असून अनेक नवोदितांना सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यात शिवडी मतदार संघातून माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या ऐवजी संतोष नलावडे यांना संधी देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#VIDEO: पुणे-नाशिकमध्ये मनसेच्या या पुराव्यामुळे होऊ शकते भाजपाची पोलखोल
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपूरमधील शिवसैनिकांचं राजकीय अस्तित्व धोक्यात
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL