12 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपूरमधील शिवसैनिकांचं राजकीय अस्तित्व धोक्यात

Shivsena, Uddhav Thackeray, Navi Mumbai, Pune, Nashik, Nagpur, BJP Maharashtra, Maharashtra Vidhansabha Election 2019

पुणे: पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.

दरम्यान तब्बल ७ ते ८ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत, असं सांगतानाच शिवसेनेनेही या जागांसाठी आग्रह धरला नाही, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या ४ ऑक्टोबर रोजीच युतीत कुणाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेने पुण्यातील हडपसर आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ मागितले होते. परंतु भारतीय जनता पक्षाने ही मागणी फेटाळली. हडपसरमधून विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर शिवाजीनगरमधून विद्यमान आमदार विजय काळेंना डावलून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे ९६ नगरसेवक निवडून आलेले आहेत. याठिकाणी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती झाली तरी महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेला वाटा देण्यात आला नाही. त्यामुळे सत्तेचे कोणतेही फायदे शिवसेनेला मिळत नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी गेली दोन-तीन वर्ष मतदारसंघ बांधणारे शिवसेनेचे इच्छुक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

दुसरं म्हणजे पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा करत महायुतीत पुणे कँटोन्मेंट व पिंपरीसह दहा जागांची मागणी करणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षालाही भारतीय जनता पक्षाने शिवसेनेप्रमाणे ठेंगाच दाखविला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुणे कँटोन्मेंटमधून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांचे नाव जाहीर केले आहे, तर पिंपरीतून शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबूकस्वार यांचे नाव जाहीर केले आहे. या दोन्ही जागांची मागणी रिपाइंकडून केली जात होती.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x