महत्वाच्या बातम्या
-
पुलवामा हल्ला: शहिद वीरांचे पार्थिव त्यांच्या प्रियजनांकडे रवाना
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. भारताच्या या वीर जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत असून, महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मातोश्रीवर फडणवीसांची युतीबाबत सकारात्मक चर्चा
मुख्यमंत्र्यांनी काल रात्री मातोश्रीवर जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, सदर बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भारतीय जनता पक्ष २५ तर शिवसेना एकूण २३ जागा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ला; महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल करांडे यांना वीरमरण
काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. सांगली जिल्ह्यातील CRPF जवान राहुल करांडे हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
6 वर्षांपूर्वी -
मनसे उत्तर-भारतीयांची द्वेषी कसं म्हणावं? अविनाश जाधवांमुळे चिमुकली आईच्या कुशीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली की ते उत्तर भारतीय द्वेषी अशी साधारण भावना प्रसार माध्यमांनीच लोकांच्या मनात बिंबवून ठेवली आहे. मग त्यात चुकीची आणि सत्यता न बघता हिंदी प्रसार माध्यमांनी देशभर त्यांच्याबद्दल नाकाराम्तक बीज रोवली. अगदी महाराष्ट्रात रोजगार हा पहिल्यांदा मराठी मुलांनाच असा आग्रह धरला तरी राज ठाकरेंची गुंडगिरी असे मथळे प्रसार माध्यमांमध्ये सहज पाहायला मिळाले. त्यात हिंदी मीडिया नेहमीच अग्रेसर राहिला, परंतु देशातील इतर राज्यात असे विषय उचलले गेले की कोणतीही वाच्यता हिंदी माध्यमं प्रसारित करत नाहीत, हे वास्तव आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि फडणवीस बेस्ट कपल, केवढा तो एकमेकांवर जीव: धनंजय मुंडे
आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेकजण स्वतःच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फाडावीसांना खोचक टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय निरूपम हटाओ, मुंबई कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत जोरदार मोहीम
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे. निरुपम यांच्याकडे पक्षाची अन्य जबाबदारी देऊन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवावी, असा आग्रह या नेत्यांनी खरगे यांच्याकडे धरल्याचे सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संपात सामील झालेल्या कामगारांचा पगार कापला
पगारवाढ तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बेस्ट कामगारांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ झाली. परंतु, दुसऱ्या बाजूला बेस्ट प्रशासनाने कामगारांचा संपकाळातील ९ दिवसांचा पगार कापला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र महापरिवर्तन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचे भाषण
महाराष्ट्र महापरिवर्तन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचे भाषण
6 वर्षांपूर्वी -
आमची ती भेट व जुन्या आठवणी, अन मनसेची भेट ती सेटलमेंट? सेनेचा रडवा प्रचार सुरु होणार?
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वापरलेलं जुनं तंत्र म्हणजे पक्षीय राजकारणाच्या भेटी गाठी. मातोश्री किंवा मातोश्री बाहेर शिवसेना आणि इतर पक्षीय नेत्यांच्या राजकीय किंवा खासगी भेटीगाठी झाल्या की प्रसार माध्यमांपुढे सहज, औपचारिक आणि जुन्या आठवणी असे शब्द प्रयोग करून विषय टोलवण्यात शिवसेना अगदी तरबेज असल्याचे मागील अनेक घटनांवरून पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक; मागे लागलेल्या रोडरोमियोत शिवसेनेला इंटरेस्ट असल्याचे वृत्त?
मागील अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूकपूर्व सर्व्हेचा धसका घेतल्याचं समजतं. त्यामुळे स्वबळ वगरे बाजूला ठेवून शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र जवळपास ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून जागावाटपावरून येणाऱ्या प्रस्तावावरून प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘रोडरोमियोसारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही’, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला फटकारलं होतं. परंतु, सध्याच्या वृत्तानुसार त्याच रोडरोमियोने खुश करणारा प्रस्ताव समोर ठेवल्याने शिवसेनेचा इंटरेस्ट वाढल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
काही लुख्खे सांगत होते की निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही, मी तर आलो
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सगळेच शिवसैनिक वाईट नाहीत, पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या थोबाडीत दिली
पुणे महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या देखतच चोप देण्यात आला आहे. नगरसेवकांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात सदर घटना घडल्याचे वृत्त आहे. प्रभागातील जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना संबंधित घटना घडल्याचे समजते. दरम्यान यावेळी स्वतः पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक देखील हजर होत्या. पुणे महापालिके’मध्ये भर दुपारच्या वेळी ही घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात देखील मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात यते आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेने भाजपशी पुन्हा युती केल्यास ती त्यांच्याच मुळाशी येण्याची शक्यता? सविस्तर
भारतीय जनता पक्ष जर आज महाराष्ट्रात पाय घट्ट करू शकला असेल ते तो शिवसेनेमुळे. राज्यात फारसं अस्तित्व नसलेला भाजप त्यावेळी शिवसेनेसोबत युती करून राज्यभर पक्ष विस्तार केला. त्यानंतर २०१४ मध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मात्र भाजप उन्मत्त झाली आणि स्वतःच्या मित्रपक्षांच्या अडचणीत वाढ करून, त्यांच्याच अस्तित्वाला आवाहन देण्याचा हेतुपुरस्कर प्रयत्न केला. त्यात भर म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केलं. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेचा आर्थिक लचकाच मोडेल अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - विद्यार्थी-पालकांनो नक्की ऐका; शिक्षण महत्वाचं! पण तेच आयुष्य आहे का? विचार करा!
सध्याची जीवघेण्या स्पर्धेमध्ये गुंतलेली शिक्षणपद्धती पालकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी मोठं आवाहन ठरली आहे. याच शिक्षणपद्धतीत पालक आणि विद्यार्थी दोघेही सारखेच भरडले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पालक आणि विद्यार्थीदेखील ताणतणावाखाली आयुष्य जगताना सहज नजरेस पडतं. परंतु, शिक्षण म्हणजेच आयुष्य आहे का? ही विचार करायला लावणारी गोष्ट आज प्रत्येक घराशी निगडित आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाण्यात मराठी माणूस न एकवटल्यास, भविष्यात त्याला एकही राजकीय वाली नसेल? सविस्तर
सध्या राज्याची राजधानी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या ठाणे, मीरा-भायंदर शहरांमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्यांक होण्याच्या दिशेने कूच करत आहे. हिंदी भाषिकांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली दिसत आहे, की इथली राजकीय गणित देखील मराठी माणसाच्या मतांवर अवलंबून राहिलेली नाही. नेमकं तेच राजकीय वास्तव स्वीकारून मराठी माणसाची शिवसेना सुद्धा उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी मुंबई-ठाणे सारख्या शहरात खुलेआम सज्ज झाली आहे. मुबईकर आणि हिंदुत्वाच्या आडून मुंबई-ठाण्यातल्या मराठी माणसाला शिवसेनेने कधी मूर्ख बनवलं याचा पत्ता त्याला स्वतःला सुद्धा अजून लागलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची लोकसभेच्या अनुषंगाने कृष्णकुंजवर नेते व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
महाआघाडीबाबत तर्कवितर्क जोडले जात असताना मनसे एकाबाजूला काही ठराविक लोकसभा मतदारसंघात तयारीला लागली होती. मनसे नक्की कोणत्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवणार ते अधिकृतपणे जाहीर झालं नसलं तरी, त्यावरच सविस्तर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कालच बैठकीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सध्या कृष्णकुंजवर सध्या सर्व नेते – पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी १६ तारखेला यवतमाळच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ते महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्याठिकाणी ते सभा देखील घेणार असल्याचे वृत्त आहे. तशी अधिकृत माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवेदन कसे स्वीकारावे माहित नसलेल्या तावडेंकडून प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना
सध्या प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरल्यासाखे दिसत आहेत. कारण तशाच काहींच्या प्रतिक्रिया भाजप नेते मंडळी आणि मंत्र्यांकडून येऊ लागल्या आहेत. राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नुकतेच काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामध्ये भेटीसाठी आलेल्या सामान्य लोकांकडून ते कशा प्रकारे आणि रुबाबात निवेदनं स्वीकारतात त्याचा प्रत्यय आला होता.
6 वर्षांपूर्वी -
याला पाडू, त्याला पाडू हे करण्याच्या धुंदीतच उद्या हे स्वतः कोसळतील: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, सत्तासंघर्षवर देखील उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, ‘सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण २४ तास त्याच नशेत राहून झिंगणे आणि झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही’, असे सामनाच्या अग्रलेखात भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH