महत्वाच्या बातम्या
-
सामान्य मराठी गुंतवणूकदार फसले? शालिनी कॅब्स'चे मालक व 'ते' राजकीय हितचिंतक कोण?
मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहरात खासगी कॅब सेवा पुरविण्यासाठी शालिनी कॅब्स या टॅक्सी सेवेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. परिवहन खात्याकडून नवं ट्रान्सपोर्ट लायसन्स काढण्यात आलं होत, त्याचवेळी नेमक्या या हालचाली सुरु झाल्या होत्या असं समजतं. विशेष म्हणजे नेमकी त्याच वेळी ओला – उबेर सारख्या बड्या कंपन्यांविरोधात फास का आवळला जात होता हे गुंतवणूकदारांना आज २-३ वर्षानंतर समजतं आहे. यात अनेक छोट्या गरीब ड्रायव्हर्स आणि मराठी लोकांनी मोठ्या आशेने दहा हजार ते दीड लाख रुपये गुंतविले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘शालिनी कॅब्स’च्या टीम सोबत शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांपासून ते खासदार सुद्धा दिसत आहेत. शिवसेना प्रणित महाराष्ट्र फ्लीट टैक्सी चालक-मालक सेना संघटनेचे खजिनदार दत्तानन पालनकर हे शालिनी कॅब्स’चे संचालक असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, पर्यावरण मंत्री कारवाई करणार का?
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाली असताना सरकारच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना सुद्धा या कार्यक्रमात सर्रास पणे प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचं समोर आल आहे. त्यामुळे सरकार प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाविषयी किती गंभीर आहे हे समजते.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनंतर आता 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांची सुद्धा बुलेट-ट्रेन बाबत नकारात्मक टीका
देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही मुंबई’ला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दूरदृष्टिकोनातून लादली जात असून त्याचा प्रत्यक्ष मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास स्वबळावर लढायच्या विचारामध्ये काँग्रेस?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्याच्या एकूणच प्रतिक्रिया पाहिल्यास, ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असं सांगत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीत भरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आणि जर राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोबत आली नाही तर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असता मल्लिकार्जून खरगे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द: राज ठाकरे
मुंबई : मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केले. पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच […]
7 वर्षांपूर्वी -
सत्तेच्या मलईपुढे स्वबळाची घोषणा फसवी? जळगाव महापालिका निवडणुकीसाठी सेना-भाजपची दोस्ती
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा करताना,’यापुढे भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीत युती नाही म्हणजे नाही आणि आम्ही यापुढे केवळ स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. परंतु ही घोषणा फुसकी असल्याचे समोर येत आहे. कारण आगामी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उधारीवर विडी-सिगारेट देण्यास नकार देताच शिवसैनिकाने पानटपरी पेटवली
नाशिक मोहाडी येथे ही घटना घडली असून रामभाऊ लोंढे या पानटपरी मालकाने सरपंच सुरेश गावित यांच्याकडे विडी, सिगारेटच्या आधीच्या शिल्लक उधारीचे पैसे मागितल्याचा रागाने सुरेश गावित यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पुन्हा टपरीवर जाऊन मुद्दाम कुरापती काढल्या आणि त्यानंतर सुरेश गावित यांनी रागाने पानटपरीला टपरीला आग लावली, अशी तक्रार रामभाऊ लोंढे यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुस्त काँग्रेस पक्षामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची चिन्ह? सविस्तर
आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना राज्यातील काँग्रेस मात्र अजून सुद्धा सुस्त असल्याचे स्पष्ट जाणवते. सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला राज्य स्तरावरील चेहराच नसल्याने अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते त्यांच्या मतदारसंघापुरतेच आवडते चेहरे आहेत. परंतु काँग्रेसमधला सुस्तपणा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत अडचणीत टाकू शकतो.
7 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना यश, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची नायब तहसीलदार पदी नियुक्ती
राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे मागील दोन वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्नं सुरु होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.
7 वर्षांपूर्वी -
वांद्रे शासकीय वसाहतील रहिवाशी 'हक्काच्या घरासाठी' राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला
मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.
7 वर्षांपूर्वी -
ते 'गुंड' की? कायदा पायदळी तुडविणाऱ्यांच्या मनमान्या सहन करणारे आपण षंड?
कालची पुण्यातील पीव्हीआर सिनेमात घडलेली घटना ही जर कायद्याच्याच नजरेतून बघायची तर तो ‘MRP’ कायदा पायदळी तुडवला गेला नसता तर अशी घटना आणि किव्हा आंदोलनं का होतील? अगदी दगदगलेल्या रोजच्या दैनंदिन आयष्यातून वेळ काढून अनेक कुटुंब किव्हा जोडपी या मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघण्यासाठी जात असतात. अगदी दोघे जण गेले असं जरी गृहीत धरलं तरी तिकीट असतं १००-२०० रुपये आणि पोपकोर्न २५० आणि समोसे – वडापाव १०० रुपये. बाहेरून खिशाला परवडतील असे खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याला बंदी असते.
7 वर्षांपूर्वी -
रामदास कदमांकडून शिवसैनिकांना प्रभावी भाषण करण्याचे प्रशिक्षण: जालना
जालन्यातील बीज शीतल सीडस्च्या सभागृहात मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यांमधील शिवसैनिकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात शिवसैनिकांना प्रभावी भाषण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने कोकणात शिवसेनेला धूळ चारली, तर सेनेने मुंबईची जागा पुन्हा राखली
मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. पण दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आले, त्यात भाजपने शिवसेनेवर मात केली आहे. त्यामुळे भाजपने कोकणात आयत्यावेळी आखलेले ‘डाव’ खरे ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने नाणार'ला जाऊन अध्यादेश रद्द केल्याचे सांगितले, मग करार कसा झाला? राष्ट्रवादी
आधीच नाणार प्रश्नी अडचणीत असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या स्थळी जाऊन नाणार’संबंधित अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला असा थेट सवाल करत पत्रकार परिषदेत केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे व माझ्या कामाची 'स्टाइल' एकच, त्यामुळे आमची गट्टी होऊ शकते: बच्चू कडू
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड अभ्यासू आहेत आणि मी “फिल्ड वर्क’शी जोडलेला असल्याने भविष्यात त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीला माझ्या “फिल्ड वर्क’ ची जोड मिळाल्यास, राज ठाकरेंना सुद्धा राजकीय सूर गवसेल अशी आशा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘नाणार’ संदर्भात कितीही करार करा, प्रकल्प सुरु होणार नाही म्हणजे नाही: नारायण राणे
नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्लास्टिकबंदी विरोधात शिवसैनिकाची मुस्लिम वस्त्यांमध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी - व्हिडिओ व्हायरल
शेख अफजल असं या शिवसैनिकच नाव असून त्याने नांदेड पालिकेतील पीर बुऱ्हाणनगर भागात स्वतःच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि समाज माध्यमांवर शेअर केला होता. त्यावर पालिका आयुक्त लहुराज माळी यांनी या प्रकारची गंभीर दखल घेत या शिवसैनिका विरोधात भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याने त्याला प्लास्टिकबंदीला विरोध केल्याने पोलिस कोठडीत धाडले आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्लास्टिकबंदी विरोधात शिवसैनिकाची मुस्लिम वस्त्यांमध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने अंमलात आणलेल्या प्लास्टिकबंदी आणि त्यावरील अवाजवी दंडा विरोधात मुस्लिम वस्त्यांमध्ये शिवसैनिकाने आवाज उठवला खरा, परंतु नांदेडच्या पालिकेतील कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी या शिवसैनिकाला नांदेड पोलिसांनी तुरुंगवारी घडवली.
7 वर्षांपूर्वी -
‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? मनसेची कदमांवर खोचक टीका
प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर पर्यावरण मंत्र्यांनी चारच दिवसात प्लास्टिक बंदीतून किराणा दुकानदारांना दिलासा दिल्याने मनसेने रामदास कदमांवर ‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? असा खोचक सवाल करत प्रश्न विचारला आहे आणि प्लास्टिकमधून खाऊ पोहोचल्यानेच रामदासाचा ‘कदम’ लगेचच घसरला, असा सणसणीत खोचक टोलाही मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा; नेते व पदाधिकाऱ्यांची जोरदार मागणी
आज मुंबईतील एम.आय.जी क्लबवर पार पडलेल्या नेते, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना सक्रिय राजकरणात आणण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL