मालेगावात आतापर्यंत ४२ पोलिसांना कोरोना, तर सोलापुरात एकाच दिवशी २१ रुग्ण
नाशिक, ३० एप्रिल: कोरोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता करोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलिसांचा फौजफाटा मालेगावमध्ये वळविण्यात आला आहे. मालेगावमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या अडीचशेच्या घरात पोहोचली आहे. मालेगावमध्ये २३ मार्चपासूनच पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. मालेगावची आर्थिक, सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमी ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहे.
दुसरीकडे सोलापुरात गुरूवारी एकाच दिवशी २१ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे रूग्णांची संख्या शंभरी पार होऊन १०२ वर पोहोचली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनावर मात केलेल्या तिघा माय-लेकांना घरी पाठविण्यात आले असून सध्या ९३ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात गुरूवारी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कोरोनाची बाधा झालेल्या २१ रूग्णांची नव्याने भर पडल्याचे सांगितले. काल बुधवारपर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ८१ वर गेल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकृतपणे सांगितले होते.
News English Summary: While the number of infected patients is increasing day by day in Malegaon, which is the ‘hotspot’ of Corona, now the anti-Corona warriors are also infected with the virus. In Malegaon, 42 police personnel have been infected with corona so far.
News English Title: Story Corona virus 42 Maharashtra police personnel tested positive for covid 19 in Malegaon city police News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News