14 December 2024 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार तेजी, तज्ज्ञांचा खरेदी सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.5 टक्के वाढीसह 1882 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अदानी ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने गुजरातमधील खावडा रिन्युएबल एनर्जी पार्कमध्ये 551 मेगावॅट सौर क्षमता असलेल्या प्रकल्पाचे काम सुरू केल्याची घोषणा केली आहे.

या प्रकल्पामध्ये 30 GW अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता असलेला प्रोजेक्ट पुढील पाच वर्षांत कार्यान्वित केला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर खावडा रिन्युएबल एनर्जी पार्क जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प बनेल. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 2.04 टक्के वाढीसह 1,890.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे दुसरे कारण म्हणजे, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस फर्मने मंगळवारी अदानी समूहाचा भाग असलेल्या 4 कंपन्यांची रेटिंग अपग्रेड केली आहे. पूर्वी या स्टॉकवर ‘नकारात्मक’ रेटिंग देण्यात आली होती, जी आता ‘स्थिर’ करण्यात आली आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा ही समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल जाहीर झाला होता. त्यानंतर मूडीजने अदानी समुहाच्या 4 कंपन्यांचे रेटिंग नकारात्मक केले होते. अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील आघाडीची अक्षय ऊर्जा निर्माण करणारी कंपनी मानली जाते.

गौतम अदानी यांनी एका निवेदनात माहिती दिली की, “अदानी ग्रीन एनर्जी कंपनी हरित ऊर्जा, सौर आणि पवन ऊर्जा यासाठी सर्वात व्यापक अक्षय ऊर्जा परिसंस्था तयार करण्याचे काम करत आहे. खावडा आरई प्लांट सारख्या धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह अदानी ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विस्तार करत आहे”.

नुकताच अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने डिसेंबर तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 148 टक्के वाढीसह 256 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 103 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 2,675 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 2,256 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मात्र, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2,100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. पुढील एका महिन्यात शेअर्सची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,700 रुपये ते 2,150 रुपये असू शकते. शेअर्समध्ये सपोर्ट किंमत 1,746 रुपये किमतीवर असून रेझिस्टन्स लेव्हल 1,990 रुपये किमतीवर आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची उच्चांक किंमत पातळी 1,991.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 439.35 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,94,194.43 कोटी रुपये आहे.

महत्वाचं :म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 15 February 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x