14 December 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Anant Ambani | मुकेश अंबानी पुत्र अनंत अंबानींना कोणताही अनुभव नाही, रिलायन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्तीवरून वाद पेटला

Anant Ambani

Anant Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवरून वाद अधिक चव्हाट्यावर आला आहे. इंटरनॅशनल प्रॉक्सी अॅडव्हायजरी फर्म इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेस इंकने शेअरहोल्डर्सना अनंत अंबानी यांच्या नियुक्तीविरोधात मतदान करण्याचा सल्ला दिला आहे. अनंत हे अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव असून नुकतेच त्यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात स्थान मिळाले आहे. मात्र, अनंत अंबानी अजूनही 28 वर्षांचे आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेसने एका नोटमध्ये म्हटले आहे – अनंत अंबानी यांच्याकडे मर्यादित नेतृत्व किंवा संचालक मंडळाचा मर्यादित अनुभव असल्याने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या मंडळातील संभाव्य योगदानाबद्दल चिंता वाढली आहे. मात्र, इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेसने अनंत अंबानी यांचे मोठे बंधू आणि बहीण आकाश आणि ईशा अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यास पाठिंबा दिला आहे.

यापूर्वी सल्लागार कंपनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता
यापूर्वी सल्लागार कंपनी आयआयएएसनेही अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. आयआयएएसने 9 ऑक्टोबर रोजी अहवाल दिला होता की अंबानी कुटुंबाची वयाच्या 28 व्या वर्षी नियुक्ती आमच्या मतदान मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाही. आयआयएएसनेही ईशा आणि आकाशच्या बोर्ड प्रवेशाच्या प्रस्तावांना पाठिंबा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात रिलायन्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मात्र, आणखी एक आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी फर्म ग्लास लुईस अनंत अंबानी यांच्या नियुक्तीच्या बाजूने आहे. अनुभवाच्या आधारे आम्ही अनंत अंबानीयांना इतर भावंडांपेक्षा वेगळे करत नाही. अनंत आणि त्यांची मोठी, जुळी भावंडं नॉन एक्झिक्युटिव्ह, नॉन इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून बोर्डावर असणं गरजेचं आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Anant Ambani faces proxy firms pushback on board seat latest check details 17 October 2023.

हॅशटॅग्स

#Anant Ambani(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x