12 December 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Astral Share Price | कमी पैशांच्या गुंतवणुकीवर लोक करोडपती झाले, शेअरमध्ये तेजीचा ट्रेंड कायम, पैसे लावणार?

Astral Share Price

Astral Share Price | PVC पाईप आणि फिटिंग्ज मेकर ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 1,905.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. सहा महिन्याच्या पडझडीनंतर आता बाजार तज्ज्ञांना या स्टॉकमध्ये तेजीचा कल दिसत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स 24 टक्क्यांनी वाढू शकतात. या कंपनीचे बाजार भांडवल 38,498.75 कोटी रुपये आहे.

एस्ट्रल स्टॉकवर सट्टेबाजी :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स मार्च 2023 तिमाहीत मजबूत कामगिरी करतील. प्लंबिंग सेगमेंटमधील ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीच्या पाईप विक्रीमध्ये दुहेरी अंकी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. पाईप्स आणि अॅडेसिव्ह या दोन्ही विभागमध्ये कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन तिमाही आधारावर सुधारण्याची शक्यता आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचे इन्व्हेंटरीचे नुकसान किमान राहील. पीव्हीसी रेझिनच्या किमती स्थिर झाल्यामुळे पाईप विभागाला सकारात्मक फायदा मिळू शकतो. याशिवाय कंपनीसाठी सकारात्मक बाब म्हणजे कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. कंपनीच्या बाथवेअर सेगमेंटमध्ये वाढ झाली आहे. कंपनीने फेब्रुवारी 2023 पर्यंत 320 शोरूम/डिस्प्ले सेंटर सुरू केले आहेत. या सर्व बाबींमुळे, ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर 2,373 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

मल्टीबॅगर परतावा :
‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स 30 डिसेंबर 2011 रोजी फक्त 15.50 रुपयांवर ट्रेड करत होते. 2011 मध्ये ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 83 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांना अवघ्या 12 वर्षात एक कोटी रुपये परतावा मिळाला आहे. या स्टॉकने केवळ दीर्घ मुदतीत नाही तर, अल्पावधीत ही चांगला नफा दिला आहे. मागील वर्षी 20 जून 2022 रोजी ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स 1584 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 सप्टेंबर 2022 रोजी पासून अवघ्या तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक सध्या 1905.10 रुपयांवर पोहचला आहे. मागील सहा महिन्यात ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स 25.35 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Astral Share Price return on investment on 11 March 2023.

हॅशटॅग्स

#Astral Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x