13 December 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

FD Calculator | खुशखबर! आता बँक एफडीवर 8.05 टक्के व्याज, दिवाळीपूर्वी या सरकारी बँकेकडून ग्राहकांना मोठी भेट

FD Calculator

FD Calculator | पंजाब नॅशनल बँकेने (PNB) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे दर दोन कोटीरुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मुदत ठेवींचे नवे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू होतील. जाणून घेऊया एफडीचे दर सविस्तर…

सर्वसामान्य नागरिकांना किती व्याज?
पंजाब नॅशनल बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.05 टक्के ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज देईल. बँक 444 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे. पंजाब नॅशनल बँकेने 180 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के व्याज दर निश्चित केला आहे. यापूर्वी तो ५.५० टक्के होता. तर 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील नवीन दर 5.80 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर किती आहे? Senior Citizen Saving Scheme
ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 4 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर बँक सर्वाधिक ७.७५ टक्के व्याज देत आहे. हे दर 60 वर्षे ते 80 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांना लागू असतील.

अतिज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर किती असेल?
7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर बँक अतिज्येष्ठ नागरिकांना 4.30 टक्के ते 8.05 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 444 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज 8.05 टक्के आहे. सुपर सिटिझन म्हणजे 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोक.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title  : FD Calculator Punjab National Bank raised fixed rates 05 November 2023.

हॅशटॅग्स

#FD Calculator(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x