28 April 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Investment in SBI | SBI बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करावी की SBI बँकेच्या शेअर्समध्ये? कुठे फायदा होईल जाणून घ्या

Investment in SBI

Investment in SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया/SBI ने आपले तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत SBI ने अप्रतिम आर्थिक निकाल दिला आहे. SBI बँकेच्या निव्वळ नफ्यात 74 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, SBI बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 12.83 टक्क्यांच्या वाढीसह 35,183 कोटी रुपयेवर गेले आहे. SBI बँकेच्या जबरदस्त तिमाही आर्थिक निकालांचा आज शेअरच्या ट्रेडिंग किमतीवर ही पाहायला मिळाला आहे. एसबीआय बँकेचा शेअर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 रुपयांच्या वाढीसह 614.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

SBI ने 1 वर्षात दिलेला परतावा :
सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर SBI बँकेच्या स्टॉकमध्ये मजबूत बाऊन्स पाहायला मिळाला होता. हा स्टॉक शेअर बाजारातील गुंतवणुकदार आणि तज्ञांच्या पसंतीस नेहमीच उतरला आहे. SBI च्या स्टॉकने मागील 1 वर्षात 21 नोव्हेंबर 2022 पासून आतपर्यंत 15.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचबरोबर हा शेअर पुढील काळात आणखी जास्त परतावा देईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर, तुम्हाला नक्की प्रश्न पडेल की SBI च्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी की, SBI मध्ये एफडी करावी, जेणेकरून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता. SBI मध्ये तज्ञांना 1 वर्षात किती परताव्याची अपेक्षा आहे हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

1 वर्षातील उच्च आणि निम्न पातळी किंमत :
SBI बँकेच्या शेअर्सची 1 वर्षातील नीचांक पातळी किंमत 425.00 रुपये होती, तर SBI बँकेच्या शेअर्सने नुकताच 622.70 रुपये ही आपली एका वर्षाची उच्चांक किंमत पातळी गाठली आहे.

SBI मधील FD चे व्याजदर :
SBI बँकेतील मुदत ठेव योजनेंतर्गत मिळणारे सर्वोच्च व्याजदर 8 टक्क्यांवर कधीही पोहोचले नाही. म्हणजेच 1 वर्षासाठी तुम्ही SBI च्या स्टॉकमध्ये पैसे न लावला FD केली तर 8 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळणार नाही.

SBI चा स्टॉकवर मिळणारा परतावा :
SBI बँकेने अप्रतिम तिमाही आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर, अनेक जागतिक तसेच भारतीय ब्रोकरेज फर्म शेअरची लक्ष्य किंमत अपग्रेड केली आहे. मॉर्गन स्टॅनली फर्मने SBI बँकेच्या शेअर्सवर ओव्हरवेट कॉल दिला असून त्याची पुढील काळातील लक्ष्य किंमत 675 रुपयांवरून 715 रुपये वाढवली आहे. दुसरीकडे, नौमुरा फर्मने SBI बँकेच्या शेअरवर लक्ष्य किंमत 690 रुपयांपर्यंत वाढवली ​​आहे. Invetech ने SBI बँकेच्या शेअरची तलक्ष्य किंमत 680 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय GS ने SBI बँकेचे शेअर पुढील काळात 728 ते 770 रुपये पर्यंत वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment in SBI stock or investment in SBI fixed deposit scheme comparison for earning high returns on 08 November 2022.

हॅशटॅग्स

Investment in SBI(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x