9 May 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान? Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
x

Multibagger Stock | पैसा हवाय? या शेअरने 1 महिन्यात 60 टक्के परतावा दिला, तर 5 वर्षात 1050 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करणार?

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात गुंतवणूक करून हमी परतावा मिळवणे, थोडे कठीण आहे. मात्र काही लोक गुंतवणूक करण्यासाठी दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात, ते ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात ते शेअर्स भविष्यात दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांना भारतीय स्टॉक मार्केटमध्ये ‘बिग व्हेल’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी नुकताच एका मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची बातमी आली आहे. या दिग्गज गुंतवणूकदाराने राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावून हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकच्या कामगिरीबद्दल सविस्तर

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
मागील एका महिन्यात राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीत 60 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. यादरम्यान कंपनीचे शेअर 590 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 954 रुपयांपर्यंत गेले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. फक्त 6 महिन्यांत राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 96 टक्क्यांची अप्रतिम वाढ दिसून आली आहे. 2022 या चालू वर्षाच्या मध्यापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग दिसून आली होती. त्यामुळे शेअर्स थोडीफार कमजोर झाले मात्र नंतर शेअर्समध्ये चांगली सुधारणा दिसून आली होती, आणि शेअरची किंमत 32 टक्क्यांपर्यंत वाढली.

मागील 5 वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1050 टक्के परतावा कमावून दिला आहे. यादरम्यान कंपनीचे शेअर 82 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक आता 954 रुपयांवर गेला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 17 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे.

आशिष कचोलिया यांची गुंतवणूक :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार, आशिष कचोलियानी राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीचे ​​2,31,683 शेअर्स 842 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. त्यांनी हे स्टॉक खरेदी करण्यासाठी सुमारे 19.50 कोटी रुपये गुंतवले आहेत. आशिष काचोलीया यांनी ही डील 4 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Raghav Productivity Enhancers Ltd share price Return on investment on 08 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x