14 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

MIC Share Price | फक्त 27 रुपयाचा MIC इलेक्ट्रॉनिक्स शेअर अल्पावधीत शेकड्यात परतावा देतोय, ऑर्डरबुक मजबूत,खरेदी करणार?

MIC Share Price

MIC Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत जबरदस्त वाढले आहेत. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किट हीट करत आहे. नुकताच एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय रेल्वेकडून एक मोठा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे.

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, तेनाली स्टेशन येथे IP आधारित एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली बदलण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या विजयवाडा विभागाने कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 27.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला जो नवीन काँट्रॅक्ट मिळाला आहे, त्याचे मूल्य 1,56,49,618.06 रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत जे काम देण्यात आले आहे, त्याची पूर्तता पुढील 12 महिन्यांत करायची आहे. मागील सहा महिन्यांत एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 121 टक्के वाढला आहे.

03 ऑक्टोबर 2022 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 25.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे.

MIC इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी 1988 पासून LED व्हिडिओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन उपकरणे, दूरसंचार सॉफ्टवेअरच्या डिझाइन, विकास आणि उत्पादन संबधित व्यवसायात गुंतली आहे. या कंपनीच्या मुख्य ग्राहक वर्गात एल एंड टी लिमिटेड, भारतीय रेलवे, आरबीआई, एचपी, एमटीएनएल, एसबीआई, पी एंड जी, एलआईसी, रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा टेलीसर्विसेज, पी एंड जी, हैदराबाद रेस कोर्स, कोल इंडिया लिमिटेड, गुजरात सायन्स सिटी, विझाग स्टील, आयडीबीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया लिमिटेड, आंध्र प्रदेश तंत्रज्ञान सेवा आणि बीएसएनएल यासारख्या दिग्गज कंपन्या आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MIC Share Price today on 03 October 2023.

हॅशटॅग्स

MIC Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x