6 May 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Multibagger Stock | 300% परतावा दिल्यानंतरही या शेअरमध्ये तेजी कायम, गुंतवणुकदारांना मालामाल करणारा स्टॉक

Multibagger Stock

Multibagger Stock | आज शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले आहेत. शेअर बाजारात पडझड असताना काही कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील या चढ-उतारांदरम्यान एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. या कंपनीचे नाव आहे, प्रिकॉल लिमिटेड. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Pricol Share Price | Usha Pricol Stock Price | BSE 540293 | NSE PRICOLLTD)

शेअरने दिलेला परतावा
बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी Pricol कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 184.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 300 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 29 डिसेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 46.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअरने मागील दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. तर 21 डिसेंबर 2020 पासून आतापर्यंत S&P BSE स्मॉलकॅप इंडेक्सने 65 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज हा स्टॉक 0.43 टक्के कमजोरीसह 184.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. बीएसई निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 216.70 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 96.45 रुपये होती.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रिकॉल कंपनीचा निव्वळ महसूल 26.6 टक्क्यांनी घसरून 501 कोटी रुपयेवर आला आहे. बॉटम लाईन 224 टक्के घसरून 47.5 कोटी रुपयेवर आली आहे. प्रिकोल कंपनी सध्या 33.4x च्या उद्योग पीईच्या तुलनेत 21.3x च्या TTM PE वर ट्रेड करत आहे. या कंपनीचे ROE प्रमाण आणि ROCE प्रमाण अनुक्रमे 9.9 टक्के आणि 14.5 टक्के नोंदवण्यात आले आहे. ही कंपनी अ गट शेअर्सचा एक घटक मानली जाते. कंपनीचा मार्केट कॅप सध्या 2,304.78 कोटी रुपये आहे.

कंपनी बद्दल
Pricol Limited ही कंपनी ऑटो उपकरण उत्पादक आणि रिप्लेसमेंट मार्केटसाठी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर संबंधित ऑटोमोबाईल घटकांचे पार्टस निर्मिती, विपणन, आणि विक्री करण्याचा उद्योग करते. Pricol ने ऑटोमोटिव्ह घटकांच्या निर्मितीसाठी दक्षिण भारतात कोईम्बतूर या ठिकाणी 1975 साली आपले पहिले उत्पादन केंद्र सुरू केले होते. ही कंपनी सध्या 45 पेक्षा अधिक देशांमध्ये अभियांत्रिकी तंत्रज्ञान सेवा प्रदान करते. आघाडीच्या ऑटोमोबाईल आणि औद्योगिक ब्रँड कंपन्यांना ही कंपनी आपली सेवा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Pricol Share Price in focus on return check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x