14 December 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Multibagger Stock | 59788% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर, तज्ज्ञांनी दिलेली नवी टार्गेट प्राईस पहा

Multibagger Stock

Multibagger Stock | युपीएल लिमिटेड ही जगातील 5 सर्वात मोठ्या ऍग्रोकेमिकल क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या शेअर्सनी दीर्घ काळात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. युपीएल लिमिटेड कंपनीने फक्त 32,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडो रुपयांचा परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये पुढील काळात आणखी तेजी पाहायला मिळेल. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी खाली आले आहेत. भारतीय ब्रोकरेज फर्म एडलवाईस ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, UPL कंपनीचे शेअर पुढील एक आठवडा ते एक महिना या कालावधीत 7 टक्क्यांहून अधिक नफा कमावून देऊ शकतात. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी UPL कंपनीचे शेअर्स 718.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी युपीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 727.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. UPL कंपनीचे बाजार भांडवल 54,908.13 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UPL Share Price | UPL Stock Price | BSE 512070 | NSE UPL)

यूपीएल ही कंपनी मुख्यतः एग्रोकेमिकल क्षेत्रात व्यापार करते. या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बक्कळ कमी करून दिली आहे. म्हणून हा स्टॉक मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. 21 वर्षांपूर्वी म्हणजेच 11 जानेवारी 2001 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकमध्ये 59788 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आणि शेअरची किंमत 718.65 रुपयेवर पोहचली आहे. जर तुम्ही 2001 रोजी UPL कंपनीच्या शेअरमध्ये 32 हजार रुपये लावले असते, तर आणि स्टॉक आतपर्यंत होल्ड करून ठेवले असते तर, सध्या तुम्ही करोडपती झाला असता.

एका वर्षातील कामगिरी :
4 मे 2022 रोजी युपीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यावेळी शेअर्सची किंमत 848 रुपये होती. तथापि पुढच्याच महिन्यात 23 जून 2022 पर्यंत स्टॉक 44 टक्क्यांनी पडला आणि 607.80 रुपयांवर आला होता. मागील काही आठवड्यात शेअर्समध्ये होणारी घसरण थांबली आणि आता अरॉकमध्ये 18 टक्के सुधारणा झाली आहे. मात्र स्टॉक अजूनही आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 15 टक्के सूटवर उपलब्ध आहे.

यूपीएलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्ला :
मागील एका महिन्यात यूपीएल कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांनी पडले आहेत. तथापि, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एडलवाईसने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील एका आठवड्यापासून ते एक महिन्याच्या कालावधीत हा स्टॉक 7 टक्क्यांनी वाढेल. या स्टॉक मध्ये पैसे लावण्यासाठी तज्ञांनी 707 रुपयांच्या स्टॉप लॉससह 770 रुपये लक्ष्य किंमतीसह गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of UPL Share Price 512070 in focus check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x