13 December 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Multibagger Stocks | 6 महिन्यांत 80 टक्के परतावा, आता मिळत आहेत फ्री बोनस शेअर्स, गुंतवणुकीसाठी हा स्वस्त शेअर आहे खास

Multibagger Stock

Multibagger Stock| सध्या शेअर बाजारात एकामागून एक कंपनी बोनस शेअर जाहीर करत आहे, जणू शेअर बाजार हा बोनस बाजार बनला आहे. अशी एक कंपनी आहे,Alphalogic Techsys. या कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचे जाहीर करताच शेअरने उसळी घेतली आहे. Alphalogic Techsys Limited कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ प्रत्येक 2 विद्यमान शेअर्समागे कंपनी 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.

बोनस शेअर्स जाहीर : Alphalogic Techsys Share Price
Alphalogic Techsys एक स्मॉल कॅप कंपनी असून आपल्या गुंतवणूकदारांना कंपनी बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. Alphalogic Techsys बोनस शेअरची रेकॉर्ड तारीखLimited कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. सध्याच्या गुंतवणूकदारांना त्यांनी होल्ड केलेल्या प्रत्येक 2 शेअर्सवर कंपनी 1 बोनस शेअर मोफत वितरीत करणार आहे. मल्टीबॅगर स्टॉक अल्फालॉजिक टॅक्सीसने बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 21 सप्टेंबर 2022 हा दिवस निश्चित केला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 74.70 रुपये नोंदवण्यात आली होती. त्याच वेळी, Alphalogic Techsys च्या शेअरची 52 आठवड्यांची निचांक पातळी किंमत 24.95 रुपये होती.

शेअरने दिलेला परतावा :
मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर ने आपल्या भागधारकांना 80 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. Alphalogic Techsys च्या शेअर्सनी अलीकडच्या काळात कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना 80 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 14 मार्च 2022 रोजी अल्फालॉजिक कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 35.65 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 14 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली, आणि बीएसईवर शेअर 64.75 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर्सची बाजारातील वाटचाल :
शेअर्सच्या परतावा चार्टचे निरीक्षण केल्यास असे दिसेल की, शेअरने आपल्या भागधारकांना 110 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. Alphalogic techsys Ltd च्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 110.9 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी, कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 30.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 सप्टेंबर 2022 रोजी अल्फालॉजिक कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 64.75 रुपये किंमत पातळीवर व्यवहार करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकनी एका वर्षात आतापर्यंत 42 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. Alphalogic Techsys चे बाजार भांडवल 146 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Alphalogic Techsys Share Price with bonus shares on 15 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x