19 May 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Multibagger Stocks | संय्यम ठेवत गुंतवणूक केली पण या शेअरने 2 महिन्यातच 100% परतावा आणि फ्री बोनस शेअर्स दिले, पुढे सुसाट

Multibagger Stocks

Multibagger Stocks | कृषी रसायन उद्योग क्षेत्रातील एक स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना जबरदस्त भेट देण्याची तयारी करत आहे. या कंपनीचे नाव आहे, “सिक्को इंडस्ट्रीज”. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात बोनस वितरीत करणार आहे. म्हणजेच सिक्को इंडस्ट्रीज कंपनी प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या कंपनीने बोनस शेअरसाठी 28 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. sikko इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली असून, लोकांचे पैसे दुप्पट वाढले आहेत.

शेअरचा परतावा :
Sikko कंपनीच्या शेअर्सनी मागील 2 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 130 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी या अॅग्रोकेमिकल कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज/NSE वर 58.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑक्टोबर 2022 रोजी सिक्को इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 143.50 रुपयांवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 18 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.46 लाख रुपये झाले असते. Sikko इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 172.95 रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 42.20 रुपये होती.

शेअरची वाटचाल :
Sikko कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात आपल्या भाग धारकांना 270 टक्के परतावा कमावून दिला आहे. sikko इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 270 टक्के नफा कमावून दिला आहे. 22 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज/NSE वर 38.60 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 143.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वर्षी सिकको इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 161 कोटी रुपये आहे.

कंपनीचा उद्योग थोडक्यात :
Sikko इंडस्ट्रीज कंपनी सॉईल कंडिशनर, सेंद्रिय कीटकनाशके आणि कृषी बुरशीनाशके यांसारख्या उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनांचा निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीची उत्पादन क्षमता प्रतिदिन 50000 लीटर कृषी रसायने निर्मित करण्याची असून, प्रतिदिन कंपनी 240MT खते निर्माण करू शकते, सोबत 28000 HDPE बाटल्या निर्माण करू शकते. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार कंपनीमध्ये 71.43 टक्के वाटा प्रमोटर्सकडे आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांचा वाटा 28.57 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Sikko Industries share price return on investment on 30 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x