7 May 2024 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही योजना पैसा अनेक पटीने वाढवतेय, स्किमचं नाव नोट करा

HDFC Mutual fund

HDFC Mutual Fund | HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मागील तीन वर्षांत लोकांना 25.45 टक्के परतावा मिळाला आहे. AMFI वेबसाइटच्या डेटानुसार HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्स इक्विटी डायरेक्ट स्कीम मागील 3 आणि 5 वर्षांत जबरदस्त नफा कमावून देणाऱ्या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारी म्युचुअल फंड योजना आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार जर तुम्ही HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्ज इक्विटी प्लॅनच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला 3 वर्षांत 5.4 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याच वेळी, या म्युचुअल फंड योजनेत 15,000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तीन वर्षांत 8.15 लाख रुपये झाले असते. 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केल्यास तुम्हाला तीन वर्षांत 2.71 लाख रुपये परतावा मिळाला असता.

लॉक इन कालावधी आणि इतर तपशील:
या म्युचुअल फंड योजनेत एक लॉक-इन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही पाच वर्षे किंवा निवृत्तीचे वय, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत गुंतवलेले पैसे काढू शकत नाही. या म्युचुअल फंडाचा मागील 5 वर्षांचा परतावा थेट योजनेंतर्गत सुमारे 15.5 टक्के वार्षिक सरासरी आणि नियमित योजनेंतर्गत 14.03 टक्के आहे. जर तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत 10,000 रुपयांची मासिक SIP 5 वर्षासाठी केली असती तर, 15.5 टक्के रिटर्नसह तुम्हाला 9 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याच वेळी, डायरेक्ट प्लॅनमध्ये दरमहा 15,000 रुपये एसआयपी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5 वर्षांत 13.6 लाख रुपये परतावा मिळाला असता. या म्युचुअल फंड योजनेचा नियमित योजनेअंतर्गत मिळालेला तीन वर्षांचा परतावा वार्षिक सरासरी 23.90 टक्के मिळाला हिता. मागील एका वर्षात थेट योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 9.27 टक्के ​​आणि नियमित योजनेअंतर्गत 7.89.टक्के परतावा मिळाला आहे.

योजनेशी संबंधित पाच महत्त्वाच्या गोष्टी :
जर तुम्ही सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही नेहमी आर्थिक गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. परताव्याच्या आधारे माहिती नसलेल्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा कष्टाचा पैसा वाया जाऊ शकतो. म्युच्युअल फंडाचा परतावा बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, परतावा मिळेल याची शाश्वती नाही. HDFC सेवानिवृत्ती बचत निधी इक्विटी योजना “अति उच्च” जोखीम श्रेणी अंतर्गत येते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी आणि कमी जोखीम असलेल्या इतर गुंतवणूक पर्यायांचाही विचार नक्की करावा.

एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स म्युचुअल फंड इक्विटी प्लॅनमध्ये 5 वर्षे किंवा सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत जो कालावधी आधी असेल तो लॉक-इन कालावधी मानला जाईल. ही गुंतवणूक योजना एक मुक्त सेवानिवृत्ती समाधान देणारी योजना आहे. HDFC म्युचुअल फंडाच्या वेबसाइटनुसार, HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड इक्विटी प्लॅन ही अधिसूचित कर बचत आणि पेन्शन असे दोन्ही लाभ असलेली योजना आहे. हा म्युचुअल फंड किमान 80 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी संबंधित गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे लावतो. 7 सप्टेंबर 2022 रोजी HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅन – डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शनची NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 33.440 रुपये होते. 7 सप्टेंबर 2022 रोजी HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅन रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शनचे निव्वळ मालमत्ता मूल्य 30.4910 रुपये होते. HDFC सेवानिवृत्ती बचत निधी इक्विटी योजना 25 फेब्रुवारी 2016 रोजी बाजारात गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली होती. 31 ऑगस्ट 2022 रोजी या म्युचुअल फंडाची AUM म्हणजेच व्यावस्थपन अंतर्गत असलेली मालमत्ता 2414.12 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual fund Retirement Savings Fund Equity Direct Plan for investment and long term benefits on 30 October 2022.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x