6 May 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर
x

Nova Agritech IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअर्सची प्राईस बँड 39 ते 41 रुपये, पहिल्याच दिवशी मोठी कमाई करा

Nova Agritech IPO

Nova Agritech IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर लेख तुमच्या फायद्याचा आहे. 22 जानेवारी 2024 रोजी नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 39-41 रुपये निश्चित करण्यात आली आहे. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO 22 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या शेअर्स इश्यूची फ्लोअर किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 19.50 पट आहे. कॅप प्राइस दर्शनी मूल्याच्या 20.50 पट आहे.

नोव्हा अॅग्रीटेक कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 365 शेअर्स ठेवले आहेत. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीच्या गुंतवणूकदारांना 29 जानेवारी रोजी शेअर्स वाटप केले जातील. आणि 30 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होईल. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीने मागील वर्षी मार्च 2023 मध्ये SEBI कडे IPO साठी मसुदा कागदपत्रे सादर केले होते. मे 2023 मध्ये कंपनीला सेबीकडून IPO लाँच करण्याची मंजुरी मिळाली.

नोव्हा अॅग्रीटेक कंपनी आपल्या IPO अंतर्गत 112 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू करणार आहे. आणि 77.5 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचे प्रवर्तक नुतलपती व्यंकटसुब्बाराव आपले शेअर्स विकणार आहेत.

नोव्हा अॅग्रीटेक कंपनीच्या IPO मध्ये 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर 15 टक्के वाटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

नोव्हा अॅग्रीटेक कंपनी आपल्या IPO मधून जमा होणाऱ्या एकूण रक्कमपैकी 14 कोटी रुपये उपकंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहे. 10 कोटी रुपये कॅपेक्ससाठी खर्च करणार आहे. तर 26 कोटी रुपये कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी खर्च करणार आहे. आणि उर्वरित रक्कम उपकंपनी नोव्हा अॅग्री सायन्सेसमध्ये गुंतवणूक करणार आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक 13 टक्के वाढीसह 210 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर या आर्थिक वर्षात वर्षात कंपनीचा PAT 50 टक्के वाढून 20.48 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या सहामाहीत नोव्हा अॅग्रीटेक कंपनीने 103 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात कंपनीचा नफा 10.4 कोटी रुपये होता.

नोव्हा अॅग्रीटेक कंपनीची स्थापना 2007 साली झाली होती. या कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र हैदराबाद शहरात स्थित आहे. नोव्हा अॅग्रीटेक ही कंपनी मुख्यतः मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि पीक पोषण यांसारख्या क्षेत्रांत व्यवसाय करते. कंपनीकडे सेंद्रिय खते, अजैविक प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म पोषक, विशेष पोषक आणि IPM असे उत्पादने आहेत. नोव्हा अॅग्रीटेक ही कंपनी कृषी बियाण्यांचाही व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nova Agritech IPO GMP Today 18 January 2024.

हॅशटॅग्स

Nova Agritech IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x