17 May 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Reliance Share Price | रिलायन्स शेअर आजवरच्या उच्चांकी पातळीवर, स्टॉक प्राईस कोणत्या टार्गेटपर्यंत जाऊ शकते?

Reliance Share Price

Reliance Share Price | भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज उच्चांकी पातळी गाठली. दिवसभरात तो 3.5 टक्क्यांनी वधारून 2995 रुपयांवर पोहोचला. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 3,024.80 रुपये आहे. कंपनीचा शेअर 4 मार्च रोजी या पातळीवर पोहोचला होता.

गोल्डमन सॅक्सने रिलायन्सच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस 2,925 रुपयांवरून 3,400 रुपये केले आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी शेअर 3.62 टक्क्यांच्या वाढीसह 2988.50 रुपयांवर व्यवहार करत होता. तर गुरुवारी 0.52 टक्क्याने घसरून 2,970.30 रुपयांवर क्लोज झाला होता.

रिलायन्सचा शेअर बीएसईवर मागील सत्रात 2884.15 रुपयांवर बंद झाला आणि आज 2899.65 रुपयांवर उघडला. गोल्डमन सॅक्सने आपल्या शेअर रिव्ह्यू नोटमध्ये म्हटले आहे की, रिलायन्सचे रिस्क-टू-रिवॉर्ड रेशो अजूनही अनुकूल आहे. हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गोल्डमन सॅक्सचे म्हणणे आहे की, 2024 ते 2026 या आर्थिक वर्षांच्या दरम्यान कंपनीचा एबिटा वार्षिक 17 टक्के दराने वाढू शकतो.

कंपनीची कामगिरी
रिलायन्सचा शेअर सध्या 50 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. मोमेंटम इंडिकेटरनुसार त्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत 9.3 टक्क्यांनी वाढून 17,265 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे कामकाजातून मिळणारे एकत्रित उत्पन्न 3.6 टक्क्यांनी वाढून 2.28 लाख कोटी रुपये झाले आहे. तिमाही आधारावर कंपनीचा नफा 0.7 टक्के तर महसूल सुमारे तीन टक्क्यांनी घटला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Reliance Share Price NSE Live 31 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Share price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x