4 May 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Russia Ukraine Crisis | रशिया-युक्रेन वादामुळे सामान्यांना धक्का बसणार | पेट्रोल, सिलिंडर अजून महागणार

Russia Ukraine Crisis

मुंबई, 24 फेब्रुवारी | रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यामुळे क्रूड ते नैसर्गिक वायूच्या किमती वाढू लागल्या आहेत. आज तब्बल 8 वर्षांनंतर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे (Russia Ukraine Crisis) गेल्या आहेत. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलसोबतच गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्यास सुरुवात होणार आहे.

Russia Ukraine Crisis Crude to natural gas prices have started rising due to Russia’s military attack on Ukraine. Today the price of crude oil has again crossed $ 100 per barrel :

याआधी, ब्रेंट क्रूडच्या किमतीने 2014 मध्ये प्रति बॅरल 100 डॉलरची पातळी ओलांडली होती. युक्रेनबाबत रशियाच्या आक्रमक भूमिकेमुळे क्रूड निर्यात क्षेत्रात लक्षणीय अस्थिरता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. रशिया प्रामुख्याने युरोपमधील रिफायनरीजना कच्चे तेल विकतो. युरोपमधील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा 35 टक्के आहे. याशिवाय रशिया युरोपला बहुतांश नैसर्गिक वायूचा पुरवठा करतो.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जग संकटात सापडणार :
रशियाचा युक्रेनवरचा हल्ला थांबला नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल. जवळपास दोन वर्षांपासून साथीच्या आजाराने ग्रासलेले जग आता एवढ्या मोठ्या लढ्याची किंमत चुकवण्याच्या स्थितीत नाही. या स्थितीत रशियावर निर्बंध लादले जातील आणि त्यामुळे क्रूड किंवा नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

शेअर बाजार कोसळला :
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्‍याच्‍या घोषणेमुळे आज शेअर बाजारांची सुरुवात जोरदार घसरणीने झाली. आज BSE सेन्सेक्स सुमारे 1813.61 अंकांनी घसरला आणि 55418.45 अंकांच्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 514.40 अंकांनी घसरून 16548.90 च्या पातळीवर उघडला.

डॉलरच्या तुलनेत रुपयाही तुटला :
दुसरीकडे, परकीय चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोरीसह उघडला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांच्या कमजोरीसह 75.16 रुपयांवर उघडला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Russia Ukraine Crisis Petrol and Gas cylinder rates will hike soon.

हॅशटॅग्स

#Russia Ukraine Crisis(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x