20 May 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

Tata Investment Share Price | टाटा तिथे नो घाटा! मागील 5 दिवसात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन शेअरने 33% परतावा दिला, स्टॉकचा इतिहास

Tata Investment Share Price

Tata Investment Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून देत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 3,522 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 33 टक्के मजबूत झाले आहे. 2023 या वर्षात टाटा इन्व्हेस्टमेंट स्टॉक 62 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के घसरणीसह 3,281.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आश्चर्यकारक परतावा
आज टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेश कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये अचानक वाढ पाहायला मिळाली होती. ही वाढ पाहून सेबी देखील आश्चर्यचकित झाली होती. म्हणून सेबीने या कंपनीकडून स्टॉक वाढीबद्दल स्पष्टीकरण मागवले होते.

21 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीने उत्तर दिले की, कंपनी व्यवस्थापनाकडे स्टॉक मधील वाढीबाबत कोणतीही माहिती नाही. शेअरमधील होणाऱ्या वाढीचे कारण कंपनीला अद्याप समजले नाहीये. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी प्रामुख्याने इक्विटी शेअर्स आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीज संबंधित गुंतवणूकीचा व्यवसाय करते.

टाटा इन्व्हेस्टमेंट ही कंपनी मुख्यतः टाटा समूहाच्या कंपन्याना नवीन उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत करते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना 1937 साली टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने द इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने केली होती.

टाटा सन्स गृपने टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे 68.5 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये टाटा उद्योग समूहातील टाटा पॉवरचा हिस्सा 1.57 टक्के आहे. तर टाटा केमिकल्स कंपनीचा हिस्सा 0.87 टक्के आहे. आणि टाटा स्टील कंपनीचा हिस्सा 0.45 टक्के आहे. तर टाटा कंज्युमर कंपनीचा हिस्सा 0.29 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Investment Share Price today on 29 September 2023

हॅशटॅग्स

Tata Investment Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x