15 December 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा व्होडाफोन-आयडिया शेअर तेजीत येणार, कंपनी कर्जमुक्त होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 20000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधिक राहून कंपनी चालू तिमाहीत इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून फंड उभारणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ( व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनी अंश )

ही बातमी प्रसारित झाल्यानंतर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 14 रुपये किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीला 5G लाँच करण्यासाठी आणि 4G सेवा मजबूत करण्यासाठी भांडवलाची नितांत गरज आहे. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड ही कंपनी कर्जबाजारी झाली असून जिओ आणि भारती एअरटेल सारख्या दिग्गज कंपन्याकडून मिळणाऱ्या जबरदस्त आव्हानाचा सामना करत आहे.

नुकताच व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीने इक्विटी आणि बाँडच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. या कंपनीमध्ये भारत सरकारने 33 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल धारण केले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी प्रेफरेंशियल शेअर्स इश्यूच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने 6 एप्रिल रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत इक्विटी शेअर्स वाटप करून भांडवल उभारणी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीवर 2.15 लाख कोटी रुपये कर्ज होते. ही कंपनी सध्या 1.38 लाख कोटी रुपये मूल्याचे स्पेक्ट्रम पेमेंट, भारत सरकारचे 69,020 कोटी रुपये समायोजित सकल महसूल दायित्व, 1,660 कोटी रुपयेचे परिवर्तनीय डिबेंचर्स आणि बँका आणि वित्तीय संस्थांची देणी या सर्व कर्जाच्या भाराखाली पूर्णतः दबली आहे.

या कंपनीला वित्तीय तोट्यातून अजूनही बाहेर येता आलेले नाही. डिसेंबर 2023 तिमाहीमध्ये व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीला 6,986 कोटी निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 7,990 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 04 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x