17 May 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Zomato Share Price | झोमॅटो स्टॉक 69 टक्के स्वस्त झाला, आता 100% परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला

Zomato Share Price

Zomato Share Price | ‘झोमॅटो’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या शेअरने प्रचंड चढउतार पाहिले आहेत. हा स्टॉक सध्या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या तुलनेत 69 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. याशिवाय स्टॉक आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 32 टक्के सूटवर मिळत आहे. मागील सहा महिन्यात स्टॉक 11.77 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. तथापि सर्व नकारात्मक गोष्टी असूनही ब्रोकरेज फर्म हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. ब्रोकरेज फर्म्सच्या मते ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 100 रुपयांपर्यंत वाढू शकतात. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.60 टक्के वाढीसह 54.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

झोमॅटोच्या ऑनलाईन ग्राहकांमध्ये घट झाली असून दिवाळीनंतर मागणी घटल्याने डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीची कामगिरी कमजोर झाली होती. तथापि ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसच्या मते, फूड डिलिव्हरी व्यवसाय पुन्हा रुळावर येऊ शकतो, ज्यामुळे झोमॅटोचा व्यवसाय वाढेल. हा सोबतच झोमॅटो गोल्डची लॉन्चिंग झाल्यापासून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे, हा स्टॉकसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्याचबरोबर कंपनीचे व्यवस्थापन ब्लिंकिटच्या व्यवसाय वाढीबाबत सकारात्मक आहेत. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्म जिओजितला झोमॅटोमध्ये चांगली वाढ होऊ शकते, असे वाटते. जिओजित फर्मने या स्टॉकवर 60 रुपये लक्ष किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्म ICII सिक्युरिटीजच्या मते, झोमॅटो कंपनी आता आपल्या वापरकर्त्यांवर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे त्याची पुढील काळात मजबूत वाढ होऊ शकते जी कंपनीसाठी फायदेशीर ठरेल. नुकताच या कंपनीने 225 शहरांमध्ये तोट्यात असलेली आणि जास्त न चालणारी सेवा बंद केली आहे. या 225 शहरांमधून कंपनीला डिसेंबर 2022 च्या तिमाहीत फक्त 0.3 टक्के ऑर्डर्स मिळाले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने जानेवारी 2023 मध्ये सकारात्मक समायोजित EBITDA लक्ष प्राप्त होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर 65 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड रेटिंग दिली आहे.

JM Financial फर्म झोमॅटो स्टॉकवर सर्वात सकारात्मक पाहायला मिळत आहे. झोमॅटो गोल्ड सेवा लाँच केल्याने कंपनीचा ताळेबंद मजबूत होईल, असे तज्ञांना वाटते. झोमॅटो Gold सेवा अंतर्गत ग्राहकांना 10 किमी अंतराच्या आतील कोणत्याही रेस्टॉरंटमधून तीन महिन्यांसाठी अमर्यादित डिलिव्हरी मागवता येईल, ते ही कोणतीही शुल्क न आकारता. त्यामुळे कंपनीचे व्यापार वाढीचे लक्ष पाहता ब्रोकरेज जेएम फायनान्शिअलने या स्टॉकवर 100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

स्टॉक सध्या सवलतीवर उपलब्ध आहे :
झोमॅटो कंपनीचे शेअर्स दोन वर्षांपूर्वी 76 रुपये किमतीवर जारी करण्यात आले होते. 23 जुलै 2021 रोजी स्टॉक बाजारात दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी शेअर 138 रुपयेपर्यंत पोहचला होता. स्टॉक लिस्टिंगनंतर 169.10 रुपयांपर्यंत पोहोचला, मात्र नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 69 टक्क्यांनी खाली आला आहे. मागील एका वर्षभरात शेअर सुमारे 90 टक्क्यांनी कमजोर झाला होता. तिथून आता स्टॉकमध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे

झोमॅटो शेअर्सची किंमत :
17 फेब्रुवारी 2022 रोजी हा स्टॉक 90 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. तर पुढील पाच महिन्यांत शेअरची किंमत 55 टक्क्यांनी घसरली आणि 26 जुलै 2022 रोजी स्टॉक 40.55 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर पोहचला होता. स्टॉकमध्ये आतापर्यंत नीचांकी पातळीपासून 28 टक्के वसुली झाली आहे, आणि ब्रोकरेज फर्मच्या मते तो आणखी 93 टक्क्यांनी वाढू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 stock market live on 20 February 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x