10 May 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Gold Price Today | सोन्याच्या दरात अजून घसरण, चांदी 774 रुपयांनी वाढली, खरेदी करण्यापूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Price Today

Gold Price Today | रुपया मजबूत होत असताना आज म्हणजेच मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 10 रुपयांनी किरकोळ घसरणीसह 50,783 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 50,793 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदी तेजीत :
आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ झाली आहे. याच्या किंमतीत ७७४ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव आज 57,064 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मागील व्यापारात तो ५६,२९० रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर
देशांतर्गत सकारात्मक इक्विटी आणि डॉलर निर्देशांकातील रातोरात झालेली घसरण याचा मागोवा घेत मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २२ पैशांनी वधारून ८२.०८ वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने हिरव्या रंगात १,६५७ डॉलर प्रति औंस आणि चांदी १८.९१ डॉलर प्रति औंस दराने ट्रेड करत होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार यांनी सांगितले की, “स्पॉट कॉमेक्स सोने सोमवारी संध्याकाळपासून किंचित कमी होऊन 1,657 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते, तर चांदीचे दर स्थिर होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates as on check details 18 October 2022.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x