15 December 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

घाटकोपर पश्चिम विधानसभा: लढत मनसेचे 'गणेश' विरुद्ध भाजपाचे 'राम' अशीच रंगणार: सविस्तर

MLA Ram Kadam, Ganesh Chukkal, MNS, BJP, Raj Thackeray, Ghatkopar West

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आणि भाजपसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी तत्कालीन मनसेचे आमदार राम कदम यांनी हवेची दिशा ओळखून मनसेला सोडचिट्ठी दिली आणि मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षात बेडूकउडी घेतली होती. वास्तविक मतदासंघात कोणताही भरीव कार्य नसताना त्यांना नशिबाने पुन्हा साथ दिली आणि मोदी लाटेत त्यांची पुन्हा लॉटरी लागली होती. मूळचे भाजपचे पदाधिकारी असताना २००९ मध्ये मनसेच्या लाटेत पहिल्यांदा आमदार झाले आणि २०१४ मध्ये हवा पालटताच भाजपामध्ये जाऊन पुन्हा आमदार झाले हे सर्वश्रुत आहे.

मात्र मागील ५ वर्षात पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आहे. मागच्या वर्षीच्या दहीहंडी दरम्यान महिलांसंबंधित सार्वजनिकपणे केलेल्या विधानानंतर त्यांची राज्यभर अत्यंत वाईट प्रतिमा झाली आहे. आमदाराच्या मूळ कामांपेक्षा ते कधी वारकरी, भजनी आणि एक ना अनेक प्रकारचे बहुरूपी व्यक्तीसारखे भंपक प्रकार करत असतात. वास्तविक त्यांच्या त्या नकोत्या विषयांचा आमदारांच्या कामाशी काडीचाही संबंध नसतो. त्यामुळे स्थानिक महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी छोट्या भेटवस्तू आमिष दाखवून १०-१५ दिवसांचे रक्षाबंधनाचे पब्लिसिटीचे स्टंट करून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत असताना. संपूर्ण मतदारसंघात मुख्य विकास कामाच्या बाबतीत बोंब असून, केवळ चमकोगिरी करण्याचे उपद्व्याप करताना दिसतात.

दरम्यान, याच घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मागील ५ वर्षांपासून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. स्थानिक तरुणांशी आणि मतदारांशी त्यांनी विविध सामाजिक उपक्रमातून चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी जवळचे संबंध असलेले गणेश चुक्कल यांनी २०१४ मध्येच आमदार राम कदमांना शह देण्याची योजना आखली होती, कारण राम कदम पक्ष सोडणार असल्याची बातमी आधीच पक्षाकडे पोहोचली होती. मात्र २०१४ मधील मोदी लाटेने त्यांना तारलं असंच म्हणावं लागेल.

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुख्य विकास कामांचा खेळ खंडोबा झाला असल्याने आमदार राम कदम मतदार संघातील स्थानिकांना केवळ निरनिराळ्या भेटवस्तू आणि अमिषातून आकर्षित करताना दिसतात आणि ते येथील सुज्ञ मतदाराला अजिबात पटत नसल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. मतदार संघात माणुसकीची मोठं मोठी प्रवचनं झाडणारे आमदार राम कदम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाच्या आदेशावर राज्यभर फिरले होते. मात्र भर दुष्काळात राज्यभर प्रचारासाठी फिरणारे राम कदम निवडणुका संपताच परदेशात समुद्राच्या पाण्याचा गारवा घेण्यास लगबगीने पळाले होते. त्यासंबंधित बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. एकाबाजूला विरोधक लोकसभेचा प्रचार संपताच मतदारसंघ सोडून राज्यभर दुष्काळ दौऱ्यावर फिरत असताना भाजपचे प्रवचन देणारे आमदार राम कदम लोकांना परदेश दौऱ्यावर दिसले होते.

दरम्यान वर्षभरापूर्वी त्यांनी महिलांबाबत केलेलं संतापजनक वक्तव्य त्यांना या विधानसभा निवडणुकीत देखील भोवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनसेचे गणेश चुक्कल यांची मतदार संघातील प्रतिमा स्वच्छ असून, घाटकोपर मधील सर्वधर्मीयांशी त्यांनी सामाजिक उपक्रमातून सलोखा निर्माण केला आहे आणि त्याचा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटकोपर पश्चिम मतदार संघातील आगामी विधानसभा मनसेचे ‘गणेश’ विरुद्ध भाजपचे ‘राम’ अशीच होणार हे निश्चित आहे.

हॅशटॅग्स

#Ramdas Kadam(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x