14 December 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

मुंबई: सेव्हन हिल्स इस्पितळात ६० वर्षीय कोरोना रुग्णाची फास लावून आत्महत्या

मुंबई, ९ मे: मुंबईत आणखी ७४८ आणखी करोनाग्रस्त सापडले असून रुग्णांचा आकडा ११,९६७ वर गेला आहे. गेल्या पाच दिवसात २८४४ रुग्ण वाढले आहेत. तर आज नव्याने २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४६२ वर गेला आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांचा असला तरी गेल्या अवघ्या पाच दिवसात २८४४ रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. धारावीतही रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २५ नवे रूग्ण धारावीत वाढले असून धारावीत आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या ८३३ वर पोहोचली आहे. यामध्ये मृतांचा आकडा २७ आहे.

दिलासादायक बाब म्हणजे धारावीत २२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे. माहिममध्ये ५ रूग्ण वाढले असून तिथं एकूण कोरोना रूग्णसंख्या ११२ झाली आहे. ज्यात ५ मृत्यू तर २८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

मात्र काही ठिकाणी कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती बिघडताना दिसत आहे. कारण मुंबई अंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल्स इस्पितळात एका ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने फास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. असं असलं तरी त्या रुग्णाच्या आत्महत्येचं मूळ कारण अजून समोर आलेलं नाही.

 

News English Summary: However, in some places, the mental condition of Corona patients is deteriorating. A 60-year-old corona-positive patient has reportedly committed suicide by hanging himself at Seven Hills Hospital in Mumbai’s Andheri East. However, the root cause of the patient’s suicide has not yet been revealed.

News English Title: Story sixty years old covid 19 patients commit suicide in Seven Hills hospital at Mumbai Andheri East News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x