15 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

महाराष्ट्रनामा इफेक्ट: त्या एसआरपी पोलिसांना सरकारकडून मदत पोहोचली

SRP Police, Corona Crisis

मुंबई, ८ मे: देशात कोरोनानं कहर वाढलेला असताना भारताचा आकडाही झपाट्यानं वाढत चाललाय. त्यातही मुंबईची वाढती संख्या तर अत्यंत धक्कादायक. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक ‘एसआरपी’ कंपन्या तातडीनं बोलावून घेण्यात आल्या आहेत. सोलापूर ‘एसआरपी कॅम्प’मधील एक तुकडीही ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणून मुंबईत दाखल झालीय.

सोलापूरहून मुंबईला दाखल झालेल्या या तुकडीतील जवानांनी मुंबई गाठल्यानंतर रात्री चक्क पुटपाथवरच बिछाना टाकला. सोलापूरमधील या तुकडीचा व्हिडिओ महाराष्ट्रनामा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर देखील त्याची जोरदार चर्चा झाली आणि व्हिडिओ देखील व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती.

त्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत विषय पोहोचताच, त्यांनी या पोलिसांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या शासकीय निवासस्थानाची आणि शिवालयाची किल्लीही त्यांनी पोलिसांसाठी पाठवली होती. मात्र, तत्पूर्वी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे देखील हा विषय पोहोचला होय आणि त्यानंतर त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली होती.

 

News English Summary: The troopers, who arrived in Mumbai from Solapur, laid down on the dirt road at night after reaching Mumbai. The video of this detachment from Solapur was published in Maharashtranama. It was then heavily discussed on social media and the video also started going viral.

News English Title: Story SRP got help from government after showing problems on Maharashtrana News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x