महत्वाच्या बातम्या
-
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली
कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावर असणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण
नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू | विजय वडेट्टीवार
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीची आत्महत्या
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती धीरज राणे,पत्नी सुषमा राणे 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी वण्या अशी मयतांची नावे आहे. पत्नीने गळफास घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खा. नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्याच्या निर्णय
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत त्यांच्या घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
नागपूरमध्ये २ दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा निर्णय
राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले आहे. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: PPE किट घालून तुकाराम मुंडेंनी थेट कोरोना रुग्णांशी संवाद साधला
कोरोना महामारीवरील उपाययोजना ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती लोकांना विश्वासात घेऊनच करावी लागणार आहे. टाळेबंदी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. जिल्ह्य़ात आता टाळेबंदी लावल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम होऊ शकतो, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तसे संकेतही दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना धास्ती: पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवा; नागपूरमध्ये लोकांची पेट्रोलसाठी झुंबड
मुंबई आणि उल्हासनगरमध्ये करोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. या दोन्ही करोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे शिवसेनेच्या या नेत्याची थेट RSS'कडे तक्रार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पर्यावरणमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून केलेल्या टीकेला शिवसेनेनंही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेनेनं अमृतांना हाणला होता.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना नागपूर न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फडणवीस हे आज न्यायालयात उपस्थित झाला. १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नागपुरातील २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता. त्यामुळे ते कोर्टात हजर होते.
5 वर्षांपूर्वी -
नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला. यावेळी जेष्ठ सिने कलाकार नाना पाटेकर उपस्थित होते. “महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
'जनता बकवास थापेबाजीला कंटाळली', शिवसेनेचा फडणवीस आणि गडकरींना टोला
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘सगळय़ात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तर राज्य सरकार न्यायाशीध लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करू शकते: गृहमंत्री
नागपूरमधील जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. जर ठोस पुरावे असतील अन् कुणी तशी तक्रार केल्या, राज्य सरकार न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया मृत्यूप्रकरणाचं रि-इन्व्हेस्टीगेशन करू शकते, असे देशमुख यांनी सांगितले. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर जिल्हा परिषद 'भाजपमुक्त'; फडणवीसांना मोठा राजकीय धक्का
नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्य़ात मंगळवारी सरासरी ६७ टक्के मतदारांनी मतदारांचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत झालेले भरघोस मतदान बघता धक्कादायक निकाल अपेक्षित होता. सकाळपासूनच धक्कादायक निकाल सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर ZP: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या आतच देशमुख कुटुंबात डबल धमाका झालेला आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का
राज्यातील एकूण सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोरगरीबांसाठी १० रूपयांत शिवभोजन योजना जाहीर
गोरगरिब जनतेसाठी लवकरच शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली. सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर फडणवीसांचा निषेध करत सभात्याग
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कितीही चिखल केला तरी देखील कुठेही कमळ फुलू देणार नाही: आ. आदित्य ठाकरे
शिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे आणि त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भाजपवर होता हे स्पष्ट होतं. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
माजी मुख्यमंत्री फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करत आहेत - पृथ्वीराज चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC