14 December 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Aryan Khan Case | नवाब मलिक यांचे सर्व आरोप खरे होते | महाविकास आघाडीतील नेत्यांचा एनसीबीवर हल्लाबोल

Aryan Khan Case

मुंबई, ०२ मार्च | सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान-कॉर्डेलिया ड्रग्ज केस प्रकरणावरून निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांद्वारे NCB वर टीका अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा एजन्सीच्या विशेष तपास पथकाला (SIT) आढळले की आर्यन खान (Aryan Khan Case) कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटमध्ये सामील नाही. क्रूझवर टाकलेल्या छाप्यांमध्येही एसआयटी विशेष पथकाला अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.

Aryan Khan Case Special Investigation Team (SIT) found that Aryan Khan was not involved in any international drug trafficking syndicate. The SIT has also found many irregularities in the raids on the cruise :

महाविकास आघाडीतील नेत्यांनी सांगितले की, केंद्रीय एजन्सी राजकीय फायद्यासाठी खोट्या केसेस करत आहेत. एसआयटी तपासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेले खंडणीचे आरोप खरे आहेत आणि ते सत्यावर आधारित होते.

समीर वानखेडे यांच्या नैत्रुत्वात धाड आणि भाजप पदाधिकारी सुद्धा सामील :
2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री, समीर वानखेडे, अधिकारी आणि काही साक्षीदारांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली, मुंबईतील ग्रीन गेट येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर, क्रूझ जहाज, कॉर्डेलियावर छापा टाकला. मात्र धक्कादायक म्हणजे या या धाडीत भाजपचे पदाधिकारी देखील सामील झाल्याचं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आणि हेच पदाधिकारी आर्यन खान संबंधित डील हाताळत असल्याचं समोर आलं होतं. आर्यन खानला अटक करण्यात आली आणि नंतर गेल्या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली.

संजय राऊतांच्या हल्लाबोल :
शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ‘एसआयटीला आढळले की आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्स नव्हते. हे एक षडयंत्र होते, आमच्यावर असेच खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सर्व हळूहळू उघड होत आहे. आम्ही लवकरच सर्वांना उघड करू. राऊत पुढे म्हणाले की, “रिपोर्टमधून सत्य बाहेर आले आहे. संपूर्ण गोष्ट बनावट आहे कारण तो शाहरुख खानचा मुलगा होता आणि त्यांना त्याच्याकडून पैसे उकळायचे होते. त्यांना त्याची बदनामी करायची होती.

आर्यनला सोडण्यासाठी एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांकडून खंडणीची मागणी :
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, कथित डील पूर्ण न झाल्याने आर्यन खानला या प्रकरणात अटक करण्यात आली.

मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “नवाब मलिक साहेब यांचा खंडणीच्या प्रयत्नाबाबतचा आरोप खरा होता कारण एनसीबीच्या पथकाला आता समजले आहे की समीर वानखेडे यांनी खान यांच्यावर केलेली कारवाई चुकीची होती. त्यामुळे समीर वानखेडे यांची चौकशी करण्याची यावी अशी सरकारकडे विनंती केली आहे आणि समीर वानखेडेंवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे असं अमोल मिटकरी म्हणाले.

काँग्रेसचा हल्लाबोल :
काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनीही एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, “एसआयटीनेच उघड केले की आर्यन खानने ड्रग्ज घेतले नाही आणि छापेमारीत वानखेडे टीमने केलेल्या चुका उघड केल्या. नवाब मलिक यांचे आरोप खरे आहेत आणि खंडणीचे रॅकेट सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर अजून कारवाई का केली नाही? असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aryan Khan Case MahaVikas Aghadi leaders attack on NCB official.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x