26 April 2024 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

Lata Mangeshkar | भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन | देशावर शोककळा पसरली

Lata Mangeshkar passes away

मुंबई, 06 फेब्रुवारी | भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. मागील जवळपास महिनाभर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Lata Mangeshkar has passed away today. At the age of 92, Latadidi breathed her last. She was under treatment at Breach Candy Hospital since last one month :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपलं. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात तीन तास ठेवण्यात येणार आहे. स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना राजकीय सन्मानाने त्यांना मुंबई पोलीस दलात मार्फत तसेच भारतीय लष्करा कडून शासकीय इंतमामान सलामी देण्यात येणार त्यामध्ये वीस पोलीस कर्मचारी सामील होतील 5 अधिकारी 2 बिगलुर तसेच 3 राऊंड हवेत फायर केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार आहेत. मुंबईत 4.30 वाजता ते पोहोचतील अशी माहिती आहे.

आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lata Mangeshkar passes away on 06 February 2022.

हॅशटॅग्स

#Lata Mangeshkar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x