16 December 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

प्लॅस्टर ममतांना आणि दुखणं भाजपला | शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र

Mamata Banerjee, Shivsena, Saamana Editorial

मुंबई, १२ मार्च: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भारतीय जनता पक्षावर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भारतीय जनता पक्षाला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भारतीय जनता पक्षाची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. (Shivsena slammed BJP over West Bengal Assembly Election 2021 through Saamana Editorial)

देशातील निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरु आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? असा सवालही उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळ्यांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भारतीय जनता पक्षाला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भारतीय जनता पक्षाच्या किमान 10-20 जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे. प. बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे.

 

News English Summary: With the Assembly elections looming, the battle for the West Bengal Assembly has heated up. Allegations have been leveled against him. Similarly, in the front page of the match, Mamata has been called Waghin and BJP has been slandered. The BJP has been criticized in the match, suggesting that Mamata’s plaster, BJP’s pain, under the headline “BJP’s boat went deeper”.

News English Title: Shivsena slammed BJP over West Bengal Assembly Election 2021 through Saamana Editorial news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x