16 May 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Special Recipe | चमचमीत काश्मिरी दम आलू रेसिपी घरच्या घरी बनवा - पहा रेसिपी

Kashmiri Dum Aloo recipe

मुंबई, २७ जुलै | काश्मिरी दम आलू रेसिपी ही साधारणपणे दोन प्रकारे बनवतात . एक असते चमचमीत दम आलू रेसिपी आणि दुसरी साध्या पद्धतीची. आज आपण अशीच चमचमीत काश्मिरी दम आलू रेसिपी बगणार आहोत. चला तर सुरु करूया.

संपूर्ण साहित्य:
6 छोटे (दम आलू)चे आलू
2 कांदे
2 टोमॅटो
2 टेबलस्पून दही
1 टीस्पून मलाई
7 लसुण पाकळ्या
1 इंच आल
5 काश्मिरी लाल मिरच्या
1 टेबलस्पून धने
1 टेबलस्पून सोप
3 लवंग
1 दालचीनी
4 मिरे
2 तमालपत्र
1 टीस्पून गरम मसाला
1 टीस्पून गोडा मसाला
1/2 टीस्पून हळद
1 टेबलस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
4 टेबलस्पून तेल
पाणी अंदाजे

संपूर्ण कृती:
१. सर्वप्रथम कढईत तेल घाला त्यात कांदा परतून घ्या आणि टोमॅटो ची प्यूरी करून घ्या.कांद्याच्या मिश्रणातआलं लसुण, सगळा खडा मसाला आणि लाला मिरच्या मिक्सरला घाला आणि वाटून घ्या

२. कढई मध्ये तेल घालून त्यात तमालपत्र,लाल मिरची घाला मग वाटलेला मसाला घालून छान परतून घ्या. एका वाटी मध्ये दही घेवून त्यात गरम मसाला, गोडा मसाला, हळद, तिखट घालून मिक्स करा. आणि थोडी सोप क्रश करून घाला.

३. आत्ता आलू थोडे उकळून घ्या मग फ्रीज मध्ये थंड करून त्याची सालं काढून त्याला टोचून घ्या.

४. आलू तेलात छान तळून घ्या.

५. मसाला तेलात छान सुटायला लागला की त्यात लाल तिखट घाला आणि तयार दह्याचे मिश्रण त्यात घाला आणि छान परतून घ्या.वरून थोडी मलाई घाला आणि मिक्स करा

६. तयार ग्रेव्ही मध्ये आलू सोडा आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा..झाकण ठेवून 10 मी बारीक गॅस वर दम येवू द्या..अगदी हॉटेल सारखी भाजी तयार होते…

७. मस्त काश्मिरी दम आलू… पराठा,नान जिर राईस सोबत सर्व्ह करा

८. काश्मिरी दम आलू

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Kashmiri Dum Aloo recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x