27 April 2024 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

Badminton star Saina Nehwal, Saina Nehwal Joins BJP Party

नवी दिल्ली : भारताची ‘फुलराणी’ अर्थात प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल राजकारणाच्या ‘कोर्टात’ उतरली आहे. राजधानी दिल्लीत सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. सायनासोबतच तिची बहीण चंद्रांशू हिनेही भाजपचा झेंडा हाती धरला. सायनाच्या रुपाने आणखी एक क्रीडापटू राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सायनाच्या रुपाने भारतीय जनता पक्षाला ‘स्टार प्रचारक’ मिळाला आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंग यांच्या उपस्थितीत सायना नेहवाल हिने भाजपत प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार आहे. याआधी कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. तसेच या दोघांनी हरियाणा लोकसभा निवडणुकही लढवली होती. मात्र दोघांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

सायनानं आतापर्यंत २४ आंतरराष्ट्रीय जेतेपदं पटकावली आहेत. तिनं तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि २०१२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. BWFच्या बहुतांश स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशीप, BWF वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर पदकं आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६’मध्ये तिला पद्म भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर तिला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारही देण्यात आला.

 

Web Title:  World Class Badminton star of India Saina Nehwal Join BJP today.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x