महत्वाच्या बातम्या
-
पालघर मनसेकडून हाथगाड़ी खेचक कामगारांना छोटी भेट देऊन कामगार दीन साजरा
आज महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन सर्वत्र साजरा केला जात असताना पालघर मनसेकडून देखील कामगार दिन अनोख्याप्रकारे साजरा करण्यात आला. राज्यभरात आज मोठ्या प्रमाणावर एक असा कामगार आहे जो रोज उन्हा तान्हात दिवसभर राबत असतो. मात्र समाजाच्या मूळ प्रवाहापासून नेहमीच दुर्लक्षित राहतो. मात्र अशाच दुर्लक्षित असलेल्या कामगार वर्गासोबत पालघर मनसेने अनोख्याप्रकारे कामगार दिन साजरा केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्याणमध्ये मतदानानंतर तब्बल ३२३ ईव्हीएम २३ तासापासून गायब
कल्याण लोकसभा निवडणूक मतदार संघात सोमवारी मतदान कोणत्याही गालबोटाशिवाय पार पडलं. मात्र, मतदानानंतर या लोकसभा मतदार संघातील तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन २३ तास बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. सोमवारी रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आली. या भागात झालेले मतदानाचा हिशोब करताना तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन गायब असल्याचं समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
6 वर्षांपूर्वी -
पनवेल: प्राणघातक हल्ला झालेल्या महाराष्ट्र सैनिकाची बाळा नांदगावकरांकडून विचारपूस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील रागातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने महाराष्ट्र सैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. जवळपास ८ ते १० गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाण्यात अनेक सामाजिक संघटनांचा शिवसेनेवर आरोप करत राष्ट्रवादीला पाठिंबा
देशात २०१४ साली बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, मागील ५ वर्षांत भाजप सरकार फेल ठरले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कधी बोलले गेले नाही. त्यातही युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा आताचा वचननामा पाहून तर भ्रमनिरास झाला. सलग पंचवीस वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने ठाण्याची वाट लावली, त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ठाण्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीच्या जाहिरातीत विकासाच्या मुद्यांवर भर
पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचे केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसला तो आयत्यावेळी विरोधकांनी पक्ष चिन्हावरून केलेलं राजकारण असंच म्हणावं लागेल. मात्र संपूर्ण पट्ट्यात कार्यकर्त्यांचं उत्तम जाळं असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं प्रथम दर्शनी दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे डझनभर मंत्री कुचकामी, आता उद्धव ठाकरेंकडून शहिदांच्या नावाने मतांचा जोगवा
यापूर्वी भाजपचे नेते आणि विशेष करून मोदी आणि अमित शहा शहीद जवानांच्या नावाने मतं मागत होते. आता सत्तेत डझनभर मंत्री असताना देखील सामान्य जनतेसाठी कुचकामी ठरल्याने हबल होऊन उद्धव ठाकरे देखील भर सभांमधून शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावे मताचा जोगवा मागितला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर: नारायण सावरा यांचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा, स्वतः प्रचारात उतरणार
लोकसभा निवडणुका जाहीर होताच पालघरमध्ये सुद्धा स्वतःच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सी खेच सुरु झाली आहे. त्यासाठी निरनिराळा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक प्रस्त म्हणून संबंधित समाजात विशेष स्थान असलेल्या व्यक्तींना स्वतःकडे खेचण्याचा सर्वच पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असतो. संपूर्ण पालघर जिल्ह्यात कातकरी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा समाज निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतो.
6 वर्षांपूर्वी -
'माऊ' म्हणजे मांजर नाही तर 'माननीय उद्धव ठाकरे': हितेंद्र ठाकूर
पालघर पोटनिवडणुकी दरम्यानच्या स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांच्या कार्यपद्धतीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्याच्यासमोरच शाळा घेत खंत व्यक्त केली. तसेच त्यांच्यासमोरच तुम्ही विकले गेला होतात की नाही असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, जर मित्रपक्षांची लायकी होती तर मतं कमी पडली असा प्रश्न देखील त्यांच्यासमोरच विचारला.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई ते पालघर; शिवसेना महाराष्ट्रात निवडणूक लढवत आहे की गुजरातमध्ये?
सध्या लोकसभा प्रचाराचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला असताना सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी प्रचाराचे नवं नवे फंडे वापरण्यात येत आहेत. परंतु शिवसेनेचा मुंबई ते पालघर पर्यंतचा प्रचार हा मुख्यत्वे गुजराती भाषेत होताना दिसत आहे. भाजपसोबत युती करण्याचा शिवसेनेचा मूळ उद्देश केवळ गुजराती मतदार तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कड्डक ट्विट! तुलसी जोशींच्या 'त्या' फाईल चोर व्हिडिओने महाराष्ट्र भाजप तोंडघशी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या तडाख्याने राज्यातील भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करत राज ठाकरे भाजपाला आणि मोदी-शहा या जोडीला व्हिडिओ पुराव्यानिशी कात्रीत पकडत आहेत. परंतु, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता महाराष्ट्र भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ या नावाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचे व्हिडिओ ट्विट करून त्यात राज ठाकरेंना मेन्शन करून टोला लगावत आहेत. वास्तविक ज्यांचा साडी चोरतानाचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे, त्या महिला कार्यकर्त्यांची त्याच दिवशी अधिकृतरित्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
बविआ'चे उमेदवार बळीराम जाधव आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांच्या भेटीला
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानिमित्ताने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांची सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपला इशारा! मी अस्मितेचा प्रश्न करणार नाही, माझे कार्यकर्ते करतील: हितेंद्र ठाकूर
पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी दरम्यान जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आयत्यावेळी निवडणूक चिन्हावरून केलेल्या राजकारणाला अनुसरून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून विरोधकांना इशाराच दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा
लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत करायची आहे. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा धक्कादायक सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीचा 'रिक्षा' चिन्हावर स्वार होत प्रचार?
बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला असला तरी त्याचा दुसराच अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे, ज्याचा कोणी विचार सुद्धा केला नसावा. बहुजन विकास आघाडीचं ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने जरी गोठवलं असलं तरी, त्यांना देण्यात आलेलं ‘रिक्षा’ चिन्ह त्यांना अधिक फायदा देईल अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघरमधून महाआघाडीची बळीराम जाधव यांना उमेदवारी
पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, एनसीपी, बहुजन विकास आघाडी या महाआघाडीतर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांनी काल मोठं शक्तिप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडे उमेदवार नसल्याने त्यांनी आयत्यावेळी भाजपचे राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून तिकीट देत पालघरच्या मैदानात उतरवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिक्षणमंत्र्यांचं गणित बघा; ७००० गुणिले १२ बरोबर ७२ हजार?
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा सामान्यांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत. ययाधी ते त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून नेहमीच वादात अडकले आहेत. आज पुन्हा पालघरमध्ये काँग्रेसच्या न्याय योजनेचा गुणाकार उपस्थितांन समोर करत असताना स्वतःच गणित देखील कच्च असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यावरून उपस्थितांमध्ये तावडेंच्या शिक्षणावरून पुन्हा कुजबुज सुरु झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
षंढ असण्यापेक्षा गुंड बरे! हितेंद्र ठाकूर यांचा बाळासाहेबांच्या शब्दात उद्धव ठाकरेंना टोला
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना लक्ष केलं आहे. वसईतील गुंडगिरी मोडून काढू, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हितेंद्र ठाकूर यांनी खासकरून स्वर्गीय. बाळासाहेबांच्या शैलीतच खरपूस समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाड तालुका पाणी टंचाईच्या विळख्यात, स्थानिक नेतेमंडळी प्रचारात दंग
मार्च महिना ओलांडताच उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु आता पाणी स्त्रोतांंवर त्याचा परिणाम होत असून पाण्याची पातळी देखील खाली जाऊ लागल्याने महाड तालुक्यावर प्रचंड पाणी टंचाईचे सावट पसरू लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्थानिक नेत्यांना सामान्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नाही आणि त्यामुळे नागरिक देखील हवालदिल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
डोंबिवली स्थानकावरील जीर्ण पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून ‘बंद’
मुंबईतील ‘हिमालय पूल’ दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने अखेर डोंबिवलीत धोकादायक पादचारी पुलावर हातोडा मारण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित पूल हा अंदाजे ३० ते ३५ वर्ष जुना असलेला हा पूल अतिशय जीर्ण झालेला असून ठिकठिकाणी पुलाची अवस्था जर्जर झाली आहे. दरम्यान, हा पूल पडण्यासाठी आज मध्य रेल्वेवर साडेपाच तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार असून त्याजागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचे विश्वासघातकी प्रयोग बघत राहण्याशिवाय वनगांच्या हाती काहीच नव्हतं
आज मुंबईच्या ‘मातोश्री’वर जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश दिला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावित हे पालघरचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगांना विचारूनच गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मी अजून थोडे काम करतो व नंतर उमेदवारी मागतो, असे वनगा यांनीच सांंगितल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER