महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या
औरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले ठाणे महानगर पालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वादाचे कारण पुढे करत भोईर कुटुंबातील चारही नगरसेवक पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे समजते. तसेच या निमित्ताने थेट एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ठाण्यात राजकीय बंड केलं जाऊ शकत अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी स्वतः डहाणू स्टेशनवर ठाण मांडून, अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर रोखणार?
दूध दरासाठी राज्यातील दूध उत्पादक अजून आक्रमक झाले आहेत. कारण गुजरातवरून येणारे दुधाचे टँकरही अडवायला स्वतः खासदार राजू शेट्टी डहाणू स्टेशनवर ठाण मांडून आहेत. अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरने अमूल दूध पुरवठा करणार असल्याचे समजल्याने राजू शेट्टी स्वतः ते रोखण्यासाठी डहाणू स्टेशनवर ठाण मांडून आहेत.
7 वर्षांपूर्वी -
बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज; पीडब्लूडी कार्यालयाची तोडफोड पण 'त्या कपाटाचा' मनसे कार्यकर्त्यांनी आदर राखला
नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवेची एकाच पावसाने अक्षरशा दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांच प्रमाण इतकं भयंकर वाढलं आहे की तासंतास प्रवाशांचा ट्रॅफिकमध्ये खोळंबा होत आहे. त्यात सरकारला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या पीडब्लूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयावर मनसेच्या नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली आणि परंतु संपूर्ण कार्यालयाची तोडफोड करताना एका कपाटावर गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने आक्रमक कार्यकर्त्यांनी आदर राखत त्या कपाटाला कोणताही स्पर्श केला नाही.
7 वर्षांपूर्वी -
अंध सरकारला खड्डे दिसत नसतील तर, जनतेसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलन दिसणारच
नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवेची एकाच पावसाने अक्षरशा दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांच प्रमाण इतकं भयंकर वाढलं आहे की तासंतास प्रवाशांचा ट्रॅफिकमध्ये खोळंबा होत आहे. त्यात सरकारला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या पीडब्लूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयाची मनसेच्या नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली असून झोपलेल्या सरकारी यंत्रणेला जाग आणण्याचा आक्रमक प्रयत्नं केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
रोखठोक! खड्डेयुक्त आयुष्याला स्वतः मुंबईकर-ठाणेकर जवाबदार? या सत्ताधारी पक्षांना एकजुटीने अद्दल घडविणे गरजेचे!
मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांची अवस्था म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. या शहरातील रस्त्यांच्या अवस्था आणि दर्जा पाहिल्यास, त्यावरून प्रवास करण म्हणजे स्वतःचा आणि प्रियजनांचा मजबुरी म्हणून रोज जीव धोक्यात घालणे असाच म्हणावा लागेल. परंतु स्वतःची अवस्था अशी का झाली आहे याचा कधी गंभीर होऊन या शहरातील लोकांनी प्रामाणिक विचार केला आहे का?
7 वर्षांपूर्वी -
मागच्यावेळी जिथे खराब रस्ते होते, तिथे चांगले रस्ते झालेले आहेत: आदित्य ठाकरे
मुंबईतील खड्यांची समस्या ही नेहमीचीच झाली असताना त्या संबंधित प्रश्न युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना प्रसार माध्यमांनी विचारला असता, ‘जर मुंबई शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेला जबाबदार धरता, तर पालिकेला तसे अधिकार सुद्धा द्या’, असं मत व्यक्त केलं. तसेच आम्ही चांगले दर्जेदार रस्ते येण्याचा प्रयत्नं करत आहोत. मागच्या वेळी जिथे खराब रस्ते होते, तिथे चांगले रस्ते झालेले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
7 वर्षांपूर्वी -
ठाणे - भिवंडी बायपास वरील साकेत पुलाला तडे, सामान्यांच्या जिवाशी खेळ
ठाणे – भिवंडी बायपास वरील साकेत पुलाला तडे, सामान्यांच्या जिवाशी खेळ
7 वर्षांपूर्वी -
रस्त्यांवरील खड्डे; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी किती निष्पापांचे प्राण घेणार?
काल ज्या घटनास्थळी आरव’चा रस्त्यांवरील खड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्याच्या बाबांनी आरवला आवडणारा दही-भात रस्त्यावर ठेवला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेकांना ते दृश्य पासून रडू कोसळले. पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आणि सत्ताधार्यांमुळे अजून किती निरपराध लोक आपल्या प्रियजनांना गमावणार आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई ठाण्यात कालपासून जोरदार पाऊस ; वाहतुकीवर परिणाम
काल पासून बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता. मुंबई व उपनगरात जोरदार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पावसाने काल रात्रीपासून धुमशान घातलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सामान्य मराठी गुंतवणूकदार फसले? शालिनी कॅब्स'चे मालक व 'ते' राजकीय हितचिंतक कोण?
मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहरात खासगी कॅब सेवा पुरविण्यासाठी शालिनी कॅब्स या टॅक्सी सेवेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. परिवहन खात्याकडून नवं ट्रान्सपोर्ट लायसन्स काढण्यात आलं होत, त्याचवेळी नेमक्या या हालचाली सुरु झाल्या होत्या असं समजतं. विशेष म्हणजे नेमकी त्याच वेळी ओला – उबेर सारख्या बड्या कंपन्यांविरोधात फास का आवळला जात होता हे गुंतवणूकदारांना आज २-३ वर्षानंतर समजतं आहे. यात अनेक छोट्या गरीब ड्रायव्हर्स आणि मराठी लोकांनी मोठ्या आशेने दहा हजार ते दीड लाख रुपये गुंतविले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘शालिनी कॅब्स’च्या टीम सोबत शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांपासून ते खासदार सुद्धा दिसत आहेत. शिवसेना प्रणित महाराष्ट्र फ्लीट टैक्सी चालक-मालक सेना संघटनेचे खजिनदार दत्तानन पालनकर हे शालिनी कॅब्स’चे संचालक असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, पर्यावरण मंत्री कारवाई करणार का?
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाली असताना सरकारच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना सुद्धा या कार्यक्रमात सर्रास पणे प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचं समोर आल आहे. त्यामुळे सरकार प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाविषयी किती गंभीर आहे हे समजते.
7 वर्षांपूर्वी -
आजपासून ठाणे विवियाना Multiplex मध्ये खाद्यपदार्थांचे भाव कमी?
आजपासून ठाणे विवियाना Multiplex मध्ये खाद्यपदार्थांचे भाव कमी?
7 वर्षांपूर्वी -
मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान
आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भिवंडीत शिवसेनेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश
भिवंडीमध्ये शिवसेनेला मनसेकडून खिंडार पाडण्यात आलं असून शहरातील प्रमुख आणि तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवास्थानी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या व्यतिरिक्त मनसेचे नेते राजू पाटील हे देखील उपस्थित होते.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'चा मुद्दा तापल्यास भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार? सविस्तर
ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला धक्का, २ नगरसेवक, पदाधिकारी व युवासेनेचे कार्यकर्ते भाजपात
मुरबाडमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दोन नगरसेविका, शहर पदाधिकारी आणि युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेत सुद्धा गळती सुरु झाली असून पुढे सुद्धा शिवसेनेला मोठे धक्के दिले जातील असा विश्वास स्थानिक नेत्यांनी बोलून दाखवला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON